आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करी अधिकाऱ्याच्या Wife चा मृत्यू, मेजरला अटक; मेट्रो स्टेशनवर सापडला होता मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित शैलजा आपल्या पतीसह दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत स्थायिक झाली होती. - Divya Marathi
पीडित शैलजा आपल्या पतीसह दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत स्थायिक झाली होती.

नवी दिल्ली - लष्करी अधिकाऱ्याची पत्नी शैलजा हिच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी रविवारी मेजर निखिल हांडा यांना मेरठ येथून अटक केली आहे. ते नागालँडच्या दीमापूर येथे तैनात आहेत. तो होंडा सिटी कारने महिलेची भेट घेण्यासाठी दिल्ली कॅन्ट परिसरात शनिवारी आला होता. यानंतर दुपारी 1.30 च्या सुमारास कॅन्ट मेट्रो स्टेशनजवळ शैलजाचा (35) मृतदेह सापडला. तिचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले आहे. सोबतच यास एक अपघात दाखवण्यासाठी मृतदेहाला कित्येकवेळा कारने चिरडले होते. सीसीटीव्ही फुटेज आणि महिलेचा मोबाईल यातून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पोलिस आरोपी मेजर पर्यंत पोहचू शकले आहेत. 


2 वर्षांपूर्वी एकाच ठिकाणी राहायचे पीडित, आरोपी
> डीसीपी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा मेजर अमित द्विवेदीची पत्नी होती. घटनेच्या जवळपास 4 तासांनंतर मेजर अमित पत्नीच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांत गेले होते. > त्यांनीच पोलिसांना आपली पत्नी सकाळी 10 वाजता फिजियोथेरेपीसाठी आर्मी बेस रुग्णालयात गेली असे सांगितले होते. ड्रायव्हरने त्यांच्या सरकारी वाहनातून शैलजाला तेथे सोडले होते. मेजर अमित जेव्हा पत्नीला परत घेण्यासाठी तेथे गेले, तेव्हा ती सापडलीच नाही. 
> यानंतर ती प्रत्यक्षात फिजिओथेरेपीला गेलीच नव्हती असे समोर आले. सुत्रांच्या माहितीनुसार, मेजर हांडा आणि शैलजा यांची भेट दीमापुर येथे 2 वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी शैलजाचे पती मेजर अमित सुद्धा तेथे तैनात होते. परंतु, 2 महिन्यांपूर्वीच मेजर अमितची दिल्लीला बदली झाली आणि त्यांच्यासोबत शैलजा सुद्धा दिल्लीत स्थायिक झाली. त्यांना 6 वर्षांचा मुलगा देखील आहे.

बातम्या आणखी आहेत...