आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली आश्रम सेक्स रॅकेट केस: 4 जानेवारीपर्यंत बाबा वीरेंद्र देवला हजर करा -हायकोर्टाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्लीच्या आश्रमातून महिला आणि अल्पवयीन मुलींच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने बाबा वीरेंद्र देव दीक्षितला 4 जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी गुरुवारी आश्रमात हाईकोर्टाद्वारे नियुक्त सीबीआय टीमने कारवाई करून मोठा खुलासा केला आहे.

> टीमने उत्तर दिल्लीच्या रोहिणी परिसरातील बाबा वीरेंद्रदेव दीक्षित यांच्या आश्रमात 9 तास कारवाई करून 41 तरुणींना सोडवले. यापैकी बहुतांश मुली अल्पवयीन होत्या. 3 मुली तर निवृत्त पोलिस इन्स्पेक्टरच्या  मुली होत्या. याआधी ज्या तरुणीने बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनामांचा खुलासा केला होता, तिचा भाऊ सीबीआय इन्स्पेक्टर आहे.

 

2 आश्रमांमध्ये भुयार
- युनिव्हर्सिटीमध्ये दोन आश्रम आहेत. एक मुख्य आणि दुसरे व्हीव्हीआयपी आश्रम. व्हीव्हीआयपी आश्रमाला नुकतेच बनवण्यात आले आहे. त्याला मुख्य आश्रमाशी जोडण्यासाठी भुयार बनवण्यात आले आहे.

- येथून व्हीव्हीआयपी आश्रमात सुख-सुविधा पोहोचवल्या जातात. यात तरुणीही सामील आहेत.

28 वर्षांपर्यँत तरुणींसोबतच राहत होता वीरेंद्र
- वीरेंद्र देवने प्रत्येक वयाच्या मुलीसाठी काम ठरवून दिलेले होते. आश्रमाच्या तिसऱ्या मजल्यावर तो स्वत: राहायचा.
- तेथे 28 वर्षांपर्यंत तरुणीही राहत होत्या. वीरेंद्र या तरुणींचे शोषण करायचा.
- 28 ते 40 वर्षांपर्यंत महिलांना चौथ्या मजल्यावर ठेवले जायचे. त्यांचे काम कपड़े आणि भांडे धुणे, आश्रमाची स्वच्छता करणे, जेवण बनवणे आणि तांदूळ-गहू असे धान्य निवडून स्वच्छ करणे असे होते. 40 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व शिकवायच्या.

 

बाबाच्या ताफ्यात लक्झरी कार
वीरेंद्र देव लक्झरी कारचा शौकीन आहे. त्याच्या ताफ्यात मर्सिडीझ- ऑडीसहित 9 लक्झरी कार आहेत. यापैकी बहुतांश काळ्या रंगाच्या आहेत. छापा पडला तेव्हा स्पिरिचुअल युनिवर्सिटीच्या बेसमेंटमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये 4 कार उभ्या होत्या.

 

बाबाला लोकांनी पाहिले नाही
स्थानिक लोकांनी वीरेंद्रला कधीही पाहिले नाही. त्यांचे म्हणणे आहे की, तो नेहमी रात्री यायचा. तो आला आहे याची माहिती दुसऱ्या दिवशी कारच्या ताफा पाहूनच मिळत होती. तो जेव्हा आश्रमात यायचा तेव्हा वर्दळ दिसायची.

 

5 राज्यांमध्ये आणि नेपाळमध्येही आश्रम
- मुख्य आश्रमाच्या कर्मचाऱ्याने सांगितल्यानुसार, दिल्ली, पंजाब, यूपी, हरियाणा आणि राजस्थानात वीरेंद्र देवचे आश्रम आहेत.
- त्याचे हेडक्वार्टर राजस्थानच्या माउंट आबूमध्ये आहे. येथे तो सर्वात जास्त काळ राहतो.
- नेपाळमध्येही वीरेंद्रचे आश्रम आहे. आश्रमातील लोकांसाठी वर्षभरातून 3 वेळा धान्याचा पुरवठा व्हायचा.

 

छतावरून उडी मारली होती एका तरुणीने
- स्थानिकांनी सांगितल्यानुसार, त्यांना येथे काहीतरी घोळ असल्याचा संशय तेव्हा आला, जेव्हा आश्रमाच्या छतावरून उडी मारून एका तरुणीने आत्महत्या केली होती.
- काही दिवसांनीच आणखी एका तरुणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, पण ती वाचली. दोन्ही घटनांनंतर यूनिवर्सिटीला जेलसारखे परिवर्तित करण्यात आले होते. येथे 24 तास कडक पहारा राहायचा.

 

चादरीचा भलामोठा पडदा करून 2 बसेसमध्ये बसवले
- महिला आयोग व चाइल्ड वेल्फेयर कमिटीच्या जॉइंट रेस्क्यू ऑपरेशनमध्ये आश्रमातील 170 पेक्षा जास्त महिला आणि तरुणींना 41 अल्पवयीन मुलींची सुटका करून शेल्टर होममध्ये पोहोचवण्यात आले.

- मीडिया आणि लोकांच्या नजरांपासून वाचण्यासाठी अगोदर पोलिस माइकवरून घोषणा करत होते की, या परिसरात फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीवर बंदी आहे. परंतु विजय विहारच्या या गल्लीत अनेक डझन कॅमेरे लगातार आश्रमाच्या गेटवर फ्लॅश होताना दिवसभर दिसले. मग तरुणींना बाहेर काढण्यासाठी आश्रमाच्या दारातून बसपर्यंत एक मानवी साखळी बनवून चादरींचा भलामोठा पडदा बनवण्यात आला. त्यातून सुटका झालेल्या तरुणी आणि महिलांना बसमध्ये बसवण्यात आले.
- महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाति मालीवाल म्हणाल्या की, आज छाप्यादरम्यान औषधांचा एक साठाही आढळला आहे.
- चाइल्ड वेल्फेयर कमिटीने एकेका मुलीचा इंटरव्ह्यू घेतला. त्यांची मेडिकल तपासणी झाली. सर्व भ्यायलेल्या आहेत. कित्येक जणी तर एक शब्दही बोलू शकलेल्या नाहीत. काही खूप हळू आवाजात बोलल्या की, आम्ही येथे ज्ञान मिळवण्यासाठी आणि मोक्षासाठी आलो होतो.

 

> हेही वाचा

22 वर्षांपासून लोक करत होते वीरेंद्र देव आश्रमाची तक्रार, तरुणींनी सांगितले बाबाचे कारनामे

 

 

पुढच्या स्लाइड्सवर इन्फोग्राफिकमधून पाहा, कसा चालायचा बाबाचा 'कारभार'...

बातम्या आणखी आहेत...