आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कूल बसमधून अपहरण झालेल्या 5 वर्षांच्या मुलाला पोलिसांनी सोडवले, चकमकीत 1 आरोपी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या मुलाचे वडील दिल्लीतील कोट्यधीश व्यापारी आहेत. ज्यावेळी मुलाचे अपहरण करण्यात आले, त्यावेळी प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू होती. - Divya Marathi
या मुलाचे वडील दिल्लीतील कोट्यधीश व्यापारी आहेत. ज्यावेळी मुलाचे अपहरण करण्यात आले, त्यावेळी प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू होती.

नवी दिल्ली - क्राइम ब्रँचच्या टीमने स्कूल बसमधून अपहरण झालेल्या 5 वर्षांच्या मुलाला सोमवारी रात्री उशीरा गाझियाबादमधून सोडवण्यात आले. कारवाईदरम्यान एका आरोपीचाही मृत्यू झाला. इतर दोन आरोपींना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या डीएसपींनी म्हटले की, पोलिस अधिक तपास करत आहेत. 


50 लाखांची खंडणी मागितली होती... 
- पोलिस अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी 10 दिवसांपासून प्रयत्न करत होते. 
- 28 जानेवारीला मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितले की, किडनॅपर्सने त्यांना 50 लाखांची खंडणी मागितली आहे. पोलिसांसाठी हा महत्त्वाचा पुरावा ठरला. 
- 25 जानेवारीला दिल्लीच्या दिलशाद गार्डन स्कूल बसमधून मुलाचे अपहरण करण्यात आले होते. अपहरण कर्त्यांनी बसच्या ड्रायव्हरलाही जखमी केले होते. 


अशी केली सुटला.. 
- दिल्ली क्राइम ब्रँचचे अधिकारी आरपी उपाध्याय यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना टिप मिळाली होती की, मुलाला गाझियाबादमध्ये ठेवण्यात आलेले आहे. अपहरण कर्त्यांनी मुलाला साहिबाबादच्या अपार्टमेंटमध्ये लवपून ठेवले होते. 
- किडनॅपर्सने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तराच्या कारवाईत एक आरोपी मारला गेला. तर 2 जणांना अरेस्ट करण्यात आले. मुलाला त्याच्या आई वडिलांकडे सोपवण्यात आले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...