आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जास्पद: दिल्लीत महिलेला निर्वस्त्र करून मारहाण; मदतीऐवजी लोकांनी शूट केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या पालम भागात एका महिलेला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली. कहर म्हणजे तिला वाचवण्याऐवजी लोक मोबाइलमधून व्हिडिओ शूट करत राहिले. या घटनेने दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीतील कुणीही पुढे येऊन महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. जिथे ही घटना घडली, तो भाग कायम वर्दळीचे मार्केट आहे. पीडित महिलेने पोलिसांना या घटनेची तक्रार दिली, परंतु गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

 

गॅस एजन्सीत अकाउंटंट आहे पीडित महिला
वास्तविक, महिला एका गॅस एजन्सीमध्ये अकाउंटंट आहे. सूत्रांनुसार, पीडित महिला एका वृद्ध महिलेच्या घरी किरायाने राहते. त्या वृद्धेचे प्रॉपर्टीवरून आपला मुलगा व सुनेशी वाद सुरू होते. यावरून जेव्हा भांडणे सुरू झाली, तेव्हा आपल्या घरमालकिणीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या या किरायेदार महिलेला सुनेने व तिच्या नातेवाइकांनी निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली.
या घटनेची घरमालक वृद्ध महिला व पीडितेने पालम पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे, परंतु अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता.    

बातम्या आणखी आहेत...