आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CRIME: नर्सरीतून परतलेली मुलगी दिवसभर रडली, मेडिकल टेस्टमध्ये झाला रेपचा खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा - दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) मध्ये नर्सरीत शिकणाऱ्या एका चिमुकलीवर शाळेतील गार्डने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. शाळेच्या स्विमिंग पूलमध्ये गार्ड म्हणून तैनात असलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही घटना गुरुवारी घडली. परंतु, शालेय प्रशासनाने संस्थेची कुप्रसिद्धी टाळण्यासाठी ही गोष्ट 2 दिवस लपववण्याचा प्रयत्न केला. पालकांनी गुरुवारी रात्रीच मुलीची मेडिकल टेस्ट घेतली होती. यानंतर आरोपीचा पत्ता लावण्यासाठी शुक्रवारी शाळेत पोहोचले. तेव्हा या चिमुकलीने आपल्या बोटाने आरोपी आणि रडून बेहाल झाली. चिमुरडीला पाहताच आरोपी गार्डने पळ काढला. शाळेच्या प्रिन्सिपल किंवा प्रशासनाने यावर काहीही केले नाही. उलट प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. यानंतर पालकांनी पोलिस स्टेशन गाठले. सूरजपूर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपी चंडी दास याला अटक केली. आता पोलिस अधिकारी शाळेवर कारवाई करणार असल्याचे सांगत आहेत.


शाळेतून आल्यानंतर दिवसभर रडली, संध्याकाळी झाला खुलासा
वडिलांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांची चिमुकली गुरुवारी दुपारी 1:50 वाजता घरी परतली होती. काही वेळातच तिने रडण्यास सुरुवात केली. तिचे रडणे काही थांबतच नव्हते. आईने आपल्या जवळ घेऊन विचारले, तेव्हा त्या मुलीने आपल्या प्रायव्हेट पार्टकडे इशारा केला. याच ठिकाणी आपल्याला खूप दुखत असल्याचे तिने सांगितले. मुलीच्या या उत्तराने आई-वडिलांना धक्काच बसला. त्यांनी वेळीच दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात नेऊन मेडिकल टेस्ट केले. त्यामध्ये मुलीच्या प्रायव्हेट पार्टशी छेडछाड आणि हायमेनला नुकसान झाल्याचे समोर आले. 


कल्पनाही केली नव्हती... मोठ्या शाळेत मुलीसोबत असे होईल...
आपल्या छकुलीसोबत इतके वाइट घडल्याचा वडिलांना विश्वास बसत नव्हता. साश्रू नयनांनी ते म्हणाले, इतक्या मोठ्या शाळेत मुलीसोबत असे होईल याची कल्पना सुद्धा केली नव्हती. अनेकांनी मला बदनामीच्या भितीने शांत राहण्याचे सल्ले दिले. परंतु, माझ्या छकुलीवर काय बेतले आणि तिला किती वेदना होत आहेत हे आम्हालाच माहिती आहे. अशात त्या नराधमाला शिक्षा दिल्याशिवाय सोडणार नाही. शाळेत तक्रार केल्यानंतरही काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हीच पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.


स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम सांगतात...
प्रिंसिपल रेणु चतुर्वेदी यांनी शालेय प्रशासनावर लावलेले आरोप फेटाळले आहेत. या घटनेची माहिती मिळाली त्याचवेळी आपण कारवाई सुरू केली असा दावा त्यांनी केला. आई-वडिलांच्या तक्रारीवरूनच आरोपीला पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी शाळेतील सीसीसीटीव्ही फुटेज पाहिला. परंतु, त्यामध्ये त्यांना कुठलेही ठोस पुरावे सापडले नाहीत. सोबतच, चिमुकल्यांसोबत नेहमीच लेडी टीचर असतात. त्या टीचरकडे मुलीने तक्रार केलीच नाही असे रेणु चतुर्वेदी म्हणाल्या.


आरोपीची कबुली...
आरोपी गार्डने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असा दावा पोलिसांनी केला आहे. त्याने यापूर्वीही अनेक मुलींचे शोषण केले असावे असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे, त्याची कसून चौकशी केली जात आहे. सोबतच, शालेय प्रशासनाकडून पोलिसांना कुठलाही फोन आलेला नव्हता. अशात शाळेने काही चूक केल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल असे आश्वासन ग्रेटर नोएडचा पोलीस अधीक्षक आशीष श्रीवास्तव यांनी दिले आहे.


पूल आणि चेंजिंग रुमच्या मध्यभागी गॅलरीत केले शोषण
स्वीमिंग पूलजवळ एक क्लास रुम आहे. त्याचा वापर चिमुकल्यांसाठी चेंजिंग रुम म्हणून केला जातो. त्याच पूलच्या शेजारी एक गॅलरी सुद्धा आहे. ती गॅलरी सीसीटीव्हीच्या रेंजमध्ये येत नाही. आरोपीने त्याच गॅलरीमध्ये या मुलीवर बलात्कार केला आहे. आरोपीला शनिवारीच अटक करण्यात आली. तसेच त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...