आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हज अनुदान संपुष्टात आणण्यासाठी विमान प्रवासभाड्यातही घट : मुख्तार अब्बास नक्वी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हज यात्रेचे अनुदान बंद केलेले असले तरी, हज प्रवाशांचे विमान प्रवासभाडे घटवण्यात आले आहे. यातून त्यांना राजकारण आणि आर्थिक पिळवणुुकीतून मुक्ती मिळाली आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले.


प्रसार माध्यमांशी बोलताना नक्वी म्हणाले, हज -२०१८ दरम्यान १ लाख ७० हजार २५ इतक्या संख्येने हज यात्रेकरू जाणार आहेत. ही विक्रमी संख्या आहे. हज यात्रेसाठी विमान कंपन्यांकडून ऑनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. यात इंडियन एअरलाइन्स -व्यतिरिक्त सौदी एअरलाइन व फ्लाइनास यांनी सर्वाधिक कमी िकंमत लावली. इंडियन एअरलाइन्स आणि सौदी एअरलाइन्स सात-सात ठिकाणांवरून तसेच फ्लाइनास विमान कंपनीची विमाने सहा ठिकाणांहून उड्डाणे करतील.


अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांनी संयुक्त प्रगतिशील आघाडी  सरकारच्या कार्यकाळात २०१३-१४ आणि २०१८ च्या हज विमान भाड्याची तुलनात्मक माहिती देताना सांगितले, पारदर्शकता आणि विमान कंपन्यांना भरमसाठ भाडे वाढवण्यास बंदी घालण्याच्या कठोर निर्देशांमुळे हजचे अनुदान बंद करण्यात आले. तरीही या वेळी हज यात्रेचे भाडे खूप कमी झाले आहे. हज अनुदानाच्या नावाखाली असलेली लूट आणि राजकीय शोषण संपुष्टात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...