आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ALERT: राजस्थानात पुन्हा धुळीचे प्रलंयकारी वादळ, तर यूपीत चक्रीवादळाची शक्यता; 12 राज्यांत आतापर्यंत 133 जण ठार Dust Storms, Rain And Severe Thunderstorms News And Updates

राजस्थानात पुन्हा धुळीचे प्रलंयकारी वादळ, तर यूपीत वादळी वाऱ्याची शक्यता; आतापर्यंत 133 ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - धुळीचे वादळ आणि चक्रीवादळाचा धोका अजूनही टळलेला नाही. हवामान विभागाने शुक्रवारी आणि शनिवारसाठी अलर्ट जारी केला आहे. खासकरून राजस्थान आणि यूपीमध्ये पुन्हा धुळीचे वादळ येऊ शकते. या परिसरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. याचा परिणाम राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांवरही पडू शकतो.

> तथापि, बुधवारी रात्री उत्तरेकडील भागात धुळीचे वादळ सुरू होते. यामुळे गुरुवारी दक्षिणी राज्यांत मूसळधार पाऊस झाला. या अचानक बदललेल्या हवामानाचा परिणाम 12 राज्यांवर पडला. यूपी, राजस्थान, मप्र, झारखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये वेगवान वारे होते. तर तेलंगाना, बंगाल आणि आंध्र प्रदेशात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यात 133 हून जास्त जणांचा मृत्यू झाला. 300 हून जास्त जखमी झाले. हजारो घरे, शेकडो वाहने आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

 

राजस्थानात पुन्हा येऊ शकते धुळीचे वादळ
- हवामान विभागाच्या मते, शुक्रवारी उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशातील काही भागांत पूर्व राजस्थानात वेगवान वारे आणि वादळ येण्याची शक्यता आहे. पश्चिमी राजस्थानाच्या काही भागांतही अशी परिस्थिती तयार होत आहे.

- हवामान विभागाने 7 मे रोजी पश्चिमी राजस्थानात धुळीचे वादळ म्हणजेच चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

तारखेनुसार जाणून घ्या, कुठे- काय होऊ शकते?

05 मे: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडच्या काही परिसरात वेगवान वारे आणि धुळीचे वादळ येऊ शकते.

06 मे: जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातील काही भागांत वेगवान वाऱ्यांसोबत धूळयुक्त वादळ येऊ शकते, गारपिटीचीही शक्यता.

07 मे: हिमाचल प्रदेशातील काही भागांत वेगवान वाऱ्यांसोबत गारा पडू शकतात. जम्मू-कश्मीर, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, चंडीगढ़, दिल्ली आणि पश्चिमी उत्तर-प्रदेशच्या काही भागांत वादळ आणि वेगवान वारे येऊ शकतात.

पश्चिमी राजस्थानच्या काही भागांत धूळीचे मोठे वादळ येऊ शकते.   

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज..  

बातम्या आणखी आहेत...