आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिकानेर जमीन गैरव्यवहार प्रकरणी वढेरांच्या अडचणी वाढल्या, दोघांना ईडीने केली अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा पुन्हा एकदा चर्चेत आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने म्हणजेच 'ईडी' ने शुक्रवारी बिकानेरच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित दोघांना अटक केली आहे. ईडीने अटक केलेल्या दोघांची नावे जयप्रकाश भगार्वा आणि अशोक कुमार अशी आहेत. 


ईडीने म्हटले आहे की, ज्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांच्यामध्ये अशोक कुमार स्‍कायलाइट हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या महेश नागर यांचे नीकटवर्तीय आहेत. स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी फर्म रॉबर्ट वढेरा यांच्यांशी संबंधित आहे. एजन्सीने कुमार आणि नागर यांच्या घरांवर याचवर्षी एप्रिल महिन्यात छापे मारले आहेत. 


या फर्मने बीकानेरमध्ये खरेदी केलेल्या जमिनींच्या चार प्रकरणांमध्ये नागर हाच प्रमुख होता. कुमार यांनी इतरांच्या पॉवर ऑफ अटॉर्नी चा वापर करून याच क्षेत्रात जमीन खरेदी केली होती. ईडीचा हा तपास काही वर्षांपूर्वी राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यातील कोलायत भागातील कंपनीने खरेदी केलेल्या 275 बीघा (बिघा म्हणजे येथील स्थानिक जमीन मोजणीचे एकक आपल्याकडील गुंठा प्रमाणे) जमीन खेरदी शी संबंधित आहे. 


ईडीने 2015 मध्ये प्रकरण दाखल केले   
पीएमएलए अंतर्गत ईडीने या प्रकरणात अनेक सराकारी अधिकाऱ्यांसह अनेकांची 1.18 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. या प्रकरणात ईडीने 2015 मध्ये प्रकरण दाखल केले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...