आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्ति चिदंबरम यांच्या घरावर ED चे छापे, काँग्रेसचा आरोप- यंत्रणांचा कठपुतळीसारखा वापर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इन्फोर्समेंट डायरेक्टोरेटने (ईडी) शनिवारी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव कार्ति यांच्या ठिकाण्यावर छापे टाकले. एअरसेल आणि मॅक्सिस यांच्यातील डिल सदर्भात ही छापेमारी होती. काँग्रेसने म्हटले आहे की नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार यंत्रणांचा विरोधकांना त्रास देण्यासाठी कठपुतळीसारखा वापर करत आहेत. याआधी 1 डिसेंबरलाही एजन्सीने कार्तिच्या ठिकाण्यांची झाडाझडती घेतली होती. 

 

काय आहे कार्ति चिदंबरम यांच्यावर आरोप? 
- पी. चिदंबरम देशाचे अर्थमंत्री असताना 2016 मध्ये फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड (FIPB)ला मंजुरी दिली होती. ईडीचा आरोप आहे की कार्ति चिदंबरम यांनी 2013 मध्ये एफआयपीबी मंजूरी असलेल्या कंपनीला गुडगाव येथील आपली मालमत्ता किरायाने दिली होती. मात्र तपास संस्थांच्या कचाट्यात अडकायचे नाही यासाठी त्यांनी ती संपत्ती विकली. 
- कार्ति यांच्यावर असाही आरोप आहे की त्यांनी प्रोव्हिजन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) कारवाईने त्रस्त होऊन त्यांची अनेक बँक खाती बंद केली आहेत. आणि इतर बँक अकाऊंट्स बंद करण्याचा प्रयत्न केला होता. 
- फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रपोजलला मंजूरी मिळवून देण्याचे हे प्रकरण आहे. 2006 मध्ये चिदंबरम अर्थमंत्री होते. तेव्हा एअरसेल आणि मॅक्सिस यांच्यातील 600 कोटींच्या विदेशी गुंतवणुकीचा कराराला मंजूरी देण्यात आली होती. 
- 3500 कोटींपेक्षा जास्त एफडीआय साठी कॅबिनेटच्या कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्सची (CCEA) मंजूरी आवश्यक असते. मात्र या प्रकरणात मंजूरी घेण्यात आली नव्हती. 


काँग्रेस आणि चिदंबरम काय म्हणाले? 
- काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, पक्षाचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ति यांच्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले जात आहे, यात आम्हाला काहीही शंका वाटत नाही. 
- पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारच्या एजन्सींज या विरोधकांविरोधात कठपुतळीसारख्या काम करत आहेत.
- चिदंबरम म्हणाले, 'ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला मात्र त्यांना काही सापडले नाही. पीएमएलए अंतर्गत केली जाणारी कारवाई ईडीच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.'
- 'अधिकारी चेन्नई येथील घरी गेले. मात्र जेव्हा ते दिल्लीतील जोरबाग येथील माझ्या घरी आले तो सर्वात मोठा विनोद होता. अधिकारी मला म्हणाले की आम्हाला वाटले या घराचा मालक कार्ति आहे. वास्तविक हे घर माझ्या नावावर आहे आणि येथे मी राहातो.'

बातम्या आणखी आहेत...