आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • फेसबुकसह सर्व सोशल साइट्सनी निवडणुका प्रभावित करणार नसल्याचे लिहून द्यावे संसदीय समितीचे निर्देश Ensure Facebook Does Not Manipulate Polls Ask Parl Panel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डेटा लीक: फेसबुकसह सर्व सोशल साइट्सनी निवडणुका प्रभावित करणार नसल्याचे लेखी द्यावे- संसदीय समिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - संसदीय समितीने माहिती आणि प्रसारण (आयटी) मंत्रालयाला निर्देश दिले आहेत की, त्यांनी फेसबुकसह तमाम सोशल नेटवर्किंग साइट्सकडून लेखी आश्वासन घ्यावे की, ते भारतातील निवडणुका प्रभावित करण्याचा प्रयत्न करणार नाहीत. ही माहिती समितीच्या बैठकीत उपस्थित एका सदस्याने दिली. डेटा लीकवरून यापूर्वी फेसबुकने माफी मागितलेली आहे. आरोप आहे की, निवडणुकांसाठी रणनीती तयार करणारी लंडनची कंपनी केम्ब्रिज अॅनालिटिकाने 5 कोटी फेसबुक युजर्सचा पर्सनल डेटा चोरला होता. 2016च्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ यांचा चुकीचा वापर करण्यात आला.

 

समितीची धुरा अनुराग ठाकूर यांच्याकडे
- भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्या नेतृत्वातील संसदीय स्थायी समितीने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना फेसबुकशी झालेले सर्व लेखी संवाद आणि त्यांची उत्तरे सादर करण्याचे निर्देशही दिले आहेत.
- समितीच्या सदस्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले की, या सोशल साइट्सद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग न होऊ देण्याबाबत उचलेल्या पावलांची माहितीही लेखी मागवण्यात आली आहे. दुसरीकडे, समितीच्या बैठकीनंतर अनुराग ठाकूर यांनी ट्विट करून ऑनलाइन सिक्युरिटी आणि प्रायव्हसीच्या प्रकरणात लोकांकडून प्रश्न आणि उपाय मागवले आहेत.

 

काय आहे फेसबुक डेटा लीक?  
- केम्ब्रिज अॅनालिटिकावर 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा चोरून अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप आहे. गार्डियन आणि न्यूयॉर्क टाइम्सने रिपोर्ट्समध्ये खुलासा केला होता की, ट्रम्प कॅम्पेनशी संबंधित ब्रिटिश फर्म अॅनालिटिकाने 2014 मध्ये फेसबुक यूजर्सचा डेटा चुकीच्या पद्धतीने मिळवला होता. फेसबुकला याबाबत माहिती होती, परंतु त्यांनी युजर्सना अलर्ट केले नाही. फेसबुकने अॅनालिटिकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरून सस्पेंड केले होते आणि हा विश्वास दिला होता की, फर्मने डेटा डिलीट केला आहे. परंतु तसे झाले नाही.

- ब्रिटिश चॅनल 4 वर अॅनालिटिकाचा सीईओ अॅलेक्झांडर निक्सने कबूल केले की, निवडणुका जिंकण्यासाठी फर्म तरुणींचा वापर करते, लाच देते आणि हरएक प्रयत्न करते. तो असेही म्हणाला की, डेटावर काम केल्यामुळे ट्रम्प यांना मोठा विजय मिळाला.

 

अॅनालिटिकाचे इंडिया कनेक्शन काय आहे?
- भाजपने आरोप केला की, 2019 च्या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस अॅनालिटिकाच्या सेवा घेत आहे. राहुल यांचे ट्विटरवर फालोअर्स वाढण्यामागे अॅनालिटिकाचाच हात असल्याची शंका भाजपने उपस्थित केली आहे. तसेच काँग्रेस अध्यक्षांच्या फेसबुक प्रोफाइलिंगचा अॅनालिटिकाशी काय संबंध आहे? असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
- राहुल गांधींनी अॅनालिटिकाची सेवा घेतल्याचे काँग्रेसने स्पष्टपणे नाकारले आहे. काँग्रेसने उलट आरोप केला की, भाजपने 2014 मध्ये या कंपनीच्या सेवा घेतल्या होत्या. याशिवाय पक्षाने म्हटले की, 2010 मध्ये जद-यू आणि भाजपने या फर्मच्या सेवा घेतल्या. असे म्हणाले की, अॅनालिटिकाची भारतीय भागीदार ओवलेन बिझनेस इंटेलिजन्स कंपनी भाजपची सहकारी जदयू खासदार के.सी. त्यागी यांचा मुलगा चालवतो.

 

बातम्या आणखी आहेत...