आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jaish E Mohammed Terrorist And Sunjuwan Camp Attacks Mastermind Mufti Waqas Killed In Army Operation

सर्जिकल अटॅक : सुंजवा हल्ल्याचा सूत्रधार ठार; कमांडोंनी मुफ्ती वकासला घेरून टिपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंजवा लष्करी तळावर 10 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्याकडून हल्ला करण्यात आला होता. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
सुंजवा लष्करी तळावर 10 फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास दहशतवाद्याकडून हल्ला करण्यात आला होता. (संग्रहित फोटो)

नवी दिल्ली- जम्मूच्या सुंजवा लष्करी कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानचा अतिरेकी मुफ्ती वकासला सोमवारी चकमकीत ठार करण्यात आले. १० फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले होते. 


लष्करानुसार, गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या टीमने अवंतीपोराच्या हतवार भागात वेढा घातला. यानंतर एका घरावर सर्जिकल अटॅक करण्यात आला. चकमकीत वकासला टिपण्यात आले. पाकिस्तानचा नागरिक असलेला वकास जैश-ए-माेहंमदचा ऑपरेशनल कमांडर होता. तो २०१७ मध्ये काश्मीर खोऱ्यात शिरला होता. संुजवा हल्ल्यासह तो दक्षिण काश्मिरातील लेथपोरामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचाही मास्टरमाइंड होता. सुंजवा कॅम्पवरील हल्ल्यासाठी त्यानेच त्रालहून आत्मघाती अतिरेक्यांना पाठवले होते. त्याने फरदीन खांडे आणि मंजूर बाबा या स्थानिक तरुणांना अतिरेकी बनवले. त्यांनीच गतवर्षी ३१ डिसंेबरच्या रात्री लेथपाेरामध्ये सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. वकासआधी जैशचा आणखी एक कुख्यात अतिरेकी नूर मोहंमद तांत्रेचा १७ डिसेंबरला खात्मा करण्यात आला होता.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती...

बातम्या आणखी आहेत...