आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या टोळ्या तयार करत नाही, अखिलेश यांचा टोला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गोरखपूर आणि फूलपूरच्या पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर सपाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दैनिक भास्करच्या प्रतिनिधींशी खास चर्चा केली. यावेळी त्यांनी भविष्यातील रणनितीचे संकेत दिले. कुटुंबात काहीही अंतर्गत वाद नसल्याचेही ते म्हणाले. गोरखपूर हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने हा विजय महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. 


काय म्हणाले अखिलेश.. 
Q :
तुम्ही इतर पक्षांची ताळमेळ कसा साधाल. तुम्हाला तर कुटुंबातच वादाचा सामना करावा लागतोय?
A : सपा पूर्णपणे एकत्रित आहे. गोरखपूरचा विजय केवळ तो मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असल्याने महत्त्वाचा नव्हता. तर हा भाजपचा बालेकिल्ला होता, हे त्यामागचे महत्त्वाचे कारण आहे. 

Q : निकालांपूर्वी सोनिया गांधींनी 20 पक्षांना भोजनासाठी आमंत्रित केले होते. त्यात तुमच्या पक्षाचाही समावेश होता. हे मोठ्या आघाडीचे संकेत आहेत का?
A : सध्या ज्याप्रमाणे देश आर्थिक आणि सामाजिक दोन्ही मुद्द्यावर ज्या संकटांचा सामना करत आहे, अशा परिस्थितीत विरोधक मूग गिळून गप्प बसू शकत नाही. बदलासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. या एकत्र येण्याचे संकेत काळानुसार मिळतीलच. 

Q : 2019 मधअये सपा-बसपा-काँग्रेस एकत्र लढणार का?
A : आम्ही तर एकत्रित लढतच आहोत. या निवडणुकीत सर्वांनी पाहिले आहे. आम्ही ही घोषणा दिली की, आम्हाला हिंदु असल्याचा अभिमान आहे, पण त्याआधी भारतीय असल्याचा अभिमान आहे. दीन-दुबळ्यांची ही एकता युपीतून संपूर्ण देशात पसरेल. 

Q : तुम्ही एक लढाई तर जिंकली, पण सोशल मीडियाच्या लढाईत तुम्ही भाजपच्या फार मागे आहात?
A : युपीमध्ये लाखो मुलांना लॅपटॉप वाटणारा मुख्यमंत्री मीच आहे. डिजिटल इंडिया आणि आयटीची पायाभरणी करण्याचे काम समाजवाद्यांनीच केले आहे. पण जर सोशल मीडियाचा अर्थ अफवा पसरवणाऱ्या टोळ्या तयार करणे हा असेल, तर समाजवादी ते काम कधीही करणार नाहीत. सपाची डिजिटल फोर्स सोशल मीडियावर सक्रिय आहे. 

Q : आगामी रणनिती काय आह?
A : राज्यसभेच्या निवडणुकीत लोकांच्या आशा पाहता, चांगले निकाल समोर येऊ शकतात. यूपीमध्ये होणाऱ्या कोणत्याही पोटनिवडणुकीत भाजप जिंकू शकणार नाही. 2019 साठी सपाने तयारी सुरू केली आहे. प्रत्येक बूथवर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. ज्येष्ठ नेते संघटना बांधणीचे काम करत आहेत. समविचारी पक्षांबरोबर चर्चांना प्राधान्य दिले आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी मी स्वतः सर्व जिल्ह्यांचा दोन दोन वेळा दौरा करणार आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...