आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: जगभरातील 1.40 कोटी Facebook युजर्सचा डाटा सार्वजनिक Facebook Says Privacy Setting Bug Affected As Many As 14 Million

सॉफ्टवेअरमधील गडबड Facebookला मान्य, जगभरातील 1.40 कोटी युजर्सचा डाटा झाला सार्वजनिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> फेसबुकने म्हटले- यूजर्सना आपल्या पोस्ट तपासण्याचे आवाहन केले आहे.

> फेसबुकचे 2.2 बिलियन युजर्स आहे.

 

नवी दिल्ली -  फेसबुकने म्हटले की, मागच्या महिन्यात त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी गडबड झाली होती, यामुळे जगभरातील 1 कोटी 40 लाख युजर्सच्या खासगी बाबी सार्वजनिक झाल्या होत्या. तथापि फेसबुकने असेही म्हटले की, ही समस्या सोडवण्यात आली आहे. नुकतेच फेसबुकवर डाटा लीकचे आरोप लागले होते. केम्ब्रिज अॅनालिटिकावर 5 कोटी फेसबुक युजर्सचा डेटा घेऊन अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप होता. यावर फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनीही स्पष्टीकरण दिले होते. दुसरीकडे, आयटी मंत्रालयाने यूजर्सचा डाटा मोबाइल कंपन्यांशी शेअर केल्याप्रकरणी फेसबुकला 20 जूनपर्यंत उत्तर मागितले आहे.

 

फेसबुकने म्हटले- गडबडीमुळे युजर्सच्या पोस्ट पब्लिक झाल्या
- फेसबुकने म्हटले की, सॉफ्टवेयरमध्ये झालेल्या गड़बड़ीमुळे युजर्सच्या केवळ नव्या पोस्टच नाही, तर फ्रेंड्स ओन्लीमध्ये टाकलेले मेसेजेसही सार्वजनिक झाले.
- फेसबुकच्या प्रायव्हसी ऑफिसर इरिन ईगन म्हणाल्या की, कंपनीला आपल्या सॉफ्टवेअरमध्ये गड़बड़ीची माहिती मिळाली आहे. तथापि, यामुळे जुन्या पोस्ट्सवरही परिणाम नाही झाला. आम्ही त्या युजर्सची ओळख पटवत आहोत, ज्यांच्या पोस्ट सार्वजनिक झाल्या.
- ते असेही म्हणाले की, सॉफ्टवेअरमध्ये गडबड 18 मे ते 27 मेदरम्यान समोर आली होती. जी 22 मे रोजीच दुरुस्त करण्यात आली होती. आम्ही ही गडबड समोर आल्यानंतर आपाल्या सर्व युजर्सना आपापल्या पोस्ट पुन्हा एकदा तपासण्याचे आवाहनही केले आहे, जेणेकरून त्यांच्या अकाउंटमधून ही गडबड दूर झाली अथवा नाही, हे कळू शकेल. 

बातम्या आणखी आहेत...