आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोया यांच्या मृत्यूची निःपक्ष चौकशी होणे गरजेचे, काँग्रेससह 16 पक्ष राष्ट्रपतींना भेटणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपवर पक्षाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे.-फाइल - Divya Marathi
काँग्रेसने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भाजपवर पक्षाची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे.-फाइल

नवी दिल्ली - सीबीआई कोर्टाचे जज बी.एच.लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हा इतिहासातील काळा दिवस असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तर भाजपने या निर्णयानंतर म्हटले की, मृत्यूप्रकरणी तपासाच्या ज्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, त्यात अप्रत्यक्षपणे काँग्रेसचा हात होता. तर काँग्रेसने भाजपचे आरोप हे प्रतिमा खराब करणारे असल्याचे म्हटले आहे. निःपक्ष चौकशीसाठी काँग्रेससह 16 विरोधीपक्ष राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटून विनंती करणार आहेत. त्यापूर्वी गुरुवारी सुप्रीम कोर्टाने सर्व याचिका फेटाळत जज लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे म्हटले होते. 


तपासच झाला नाही 
काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला म्हणाले की, हा भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय आहे. कारण संशयास्पद परिस्थितीत जज लोया यांचा मृत्यू झाला होता. ही बाब न्याय व्यवस्थेवर विश्वास असलेल्यांना त्रस्त करणारी आहे. आतापर्यंत निर्णयाची कॉपीही देण्यात आलेली नाही. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात. सुरजेवाला म्हणाले की, गुन्हयांशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची आधी चौकशी केली जाते. पण सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटर प्रकरणाच्या केसवर सुनावणी करणाऱ्या जज लोया यांच्या मृत्यूप्रकरणी असे काहीही झाले नाही. 


16 पक्ष राष्ट्रपतींना विनंती करणार 
सुरजेवाला यांनी सांगितले की, जज लोया प्रकरणामध्ये काँग्रेसने कोणतीही याचिका दाखल केली नव्हती. आम्ही आता जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. काँग्रेससह 16 पक्ष या निर्णयाबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. दरम्यान या निर्णयानंतर भाजपने काँग्रेसवर लावलेले आरोप निषेधार्ह असल्याचेही सूरजेवाला म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...