आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीमध्ये बनावट शिक्षण मंडळाचा पर्दाफाश, 17 संस्थांच्या 17 हजार बनावट पदव्या सापडल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीसह १५ राज्यांत बनावट शिक्षण मंडळाची स्थापना करून लाेकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. गीता कॉलनी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडील १७ शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांच्या १७ हजार बनावट पदव्या आढळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बोर्डाचा संचालक शिवप्रसाद पांडे याचाही समावेश आहे.  जिल्हा पोलिस उपायुक्त नूपुर प्रसाद यांनी सांगितले, ११ सप्टेंबर रोजी एका तरुणाने बनावट गुणपत्रक असल्याची तक्रार दिली होती. बनावट पदवी देणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना पोलिस प्रशांत सोळंकी नावाच्या तरुणापर्यंत पोहोचले. त्याची चौकशी केल्यानंतर इतर आरोपींनाही पकडण्यात आले.  


 १० वर्षांपूर्वी मथुरा गुरुकुल येथून टोळीची सुरुवात झाली. या टोळीचा प्रमुख मांगेराम आचार्य ऊर्फ मनीष प्रतापसिंह याने नंतर दिल्लीच्या गोपालपूर गावात बस्तान बसवले. आरोपींनी लोकांना पहिल्या इयत्तेपासून एमबीबीएसपर्यंत पदव्यांचे वाटप केले. ही टोळी महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाबसह १५ राज्यात कार्यरत होती. 

 

एमबीबीएस, लॉ, इंजिनिअरिंगच्या बनावट पदव्या  
आरोपी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या शाळेचे नाव सांगून परीक्षा घेत असत. उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना गुणपत्रिका देत असत. कमी गुण मिळाले असतील तर जास्तीचे पैसे घेऊन गुण वाढवूनही देत होते. आरोपींनी चौकशीत सांगितले, गेल्या १० वर्षांत १५  हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना बनावट पदव्या दिल्या आहेत. यात १२ वी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र नव्हे तर एमबीबीएस, लॉ, इंजिनिअरिंगच्या पदव्यांचाही समावेश आहे. या बनावट प्रमाणपत्रावर विद्यार्थी परदेशातही नोकरी करत आहेत.

 

याआधीही पकडले टोळीतील सदस्य 

टोळीतील अनेक सदस्यांवर दिल्ली, पंजाब आणि राजस्थान पोलिसांनी याआधी कारवाई केली आहे. बनावट शिक्षण बोर्डाचे संस्थापक मांगेराम आचार्य यांच्यासह अनेक लोकांना अटक करून तुरुंगात पाठवणी करण्यात आली आहे. यानंतर शिवप्रसाद पांडे याने टोळी चालवली.  

 

या राज्यांत टोळी कार्यरत  

महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश ,ओडिशा, झारखंड.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, जशी पदवी, तसा दाम... 

बातम्या आणखी आहेत...