आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: प्रणव मुखर्जींचा हा Fake Photo होतोय व्हायरल Fake Photo Of Pranab In RSS Style Salute Goes Viral Sharmishtha Raised Question

प्रणव मुखर्जींचा हा Fake Photo होतोय व्हायरल, शर्मिष्ठा म्हणाल्या- ज्याची भीती होती तेच झाले!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) च्या दीक्षांत समारोहातील एक Fake Foto व्हायरल होत आहे. यात ते आरएसएस कार्यकर्त्यांप्रमाणे अभिवादन करताना दिसत आहेत. गुरुवारी हा कार्यक्रम संपल्यानंतर काही वेळानेच त्यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर करून म्हटले- ज्याची भीती होती तेच झाले! मी माझ्या वडिलांना याबाबत सतर्क केले होते. तथापि, 6 जून रोजीच शर्मिष्ठा यांनी ट्विट करून प्रणव यांना नागपूरला न जाण्याचा सल्ला दिला होता.

 

काय आहे फेक फोटोमध्ये?
-सोशल मीडियावर जो फोटो व्हायरल होत आहे, त्यात प्रणव मुखर्जी मंचावर सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत संघाच्या प्रार्थनेवेळी अभिभादनाच्या मुद्रेत दिसत आहेत.
- हरियाणा काँग्रेस आयटी सेलच्या स्टेट इंचार्ज रुची शर्मा म्हणाल्या आरएसएसच्या कार्यक्रमाचे दोन फोटो शेअर केले. एकात संघ नेत्यांसोबत प्रणवदा संघाची टोपी आणि अभिवादन करताना दिसत आहेत. रुची यांनी या फोटोला फेक म्हटले आहे. त्यांनी आरोप केला की, ही कलाकारी भाजपच्या आयटी सेलची आहे. प्रणवदा यांनी संघाची टोपी घातलीच नाही आणि संघपद्धतीचे अभिवादनही केले नाही. 

 

वास्तव काय आहे?
- संघाचा दीक्षांत समारोह 7 जून रोजी नागपुरात झाला. प्रणव मुखर्जी यात सहभागी होते.
- संघाच्या प्रार्थनेदरम्यान मंचावर ते सरळ उभे होते. त्या वेळी मोहन भागवत यांच्यासोबत इतर संघ कार्यकर्ते परंपरेनुसार अभिवादनाच्या मुद्रेत होते. त्यांनी एकदाही अभिवादन केले नाही.

 

शर्मिष्ठा म्हणाल्या- मला याचीच भीती होती
- शर्मिष्ठा मुखर्जी यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ज्याची भीती होती, तेच झाले. मी वडिलांना याबाबत सतर्कही केले होते. संघाच्या कार्यक्रमानंतर काही वेळानेच भाजप आणि संघाद्वारे डर्टी ट्रिक्सचा वापर करण्यात येत आहे.
- यापूर्वी 6 जून रोजी त्यांनी ट्विटरवर वडिलांना सल्ला देत लिहिले होते की, आरएसएसलाही वाटत नाही की, तुम्ही भाषणात त्यांच्या विचारधारेचे कौतुक कराल, परंतु गोष्टी विसरल्या जातात. राहतील तर ते फक्त फोटो, जे फेक जबाबांसह प्रसारित केले जातील. नागपुरात जाऊन तुम्ही भाजपा-आरएसएसला फेक न्यूज प्लांट करणे, अफवा पसरवण्याची पूर्ण संधी देत आहात."
- तथापि, त्यांनी हे ट्विट एका वृत्तानंतर दिले होते, ज्यात म्हटले होते की, त्या भाजप प्रवेश करणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...