आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावत : अहमदाबादच्या मॉलमध्ये तोडफोड, गाड्या जाळल्या; 7 राज्यांत राजपूत संघटनांना विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पद्मावतच्या विरोधात अहमदाबादच्या मॉलबाहेर आंदोलकांनी मंगळवारी अनेक गाड्या जाळल्या. - Divya Marathi
पद्मावतच्या विरोधात अहमदाबादच्या मॉलबाहेर आंदोलकांनी मंगळवारी अनेक गाड्या जाळल्या.

जयपूर/अहमदाबाद - संजय लीला भंसाळी यांचा चित्रपट 'पद्मावत' च्या विरोधात देशभरात करणी सेना आणि राजपूत संघटनांकडून विरोध सुरू आहे. गुजरातचत्या अहमदाबादमध्ये मंगळवारी रात्री काही समाजकंटकांनी तोडफोड केली. याठिकाणी उभ्या असलेल्या अनेक गाड्या जाळल्या. सुप्रीम कोर्ट आणि सेंसॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवी झेंडी दाखवली आहे. कोर्टाने निर्णयावर पुन्हाएकदा विचार करण्याच्या मध्य प्रदेश आणि राजस्थान सरकारच्या याचिका फेटाळल्या आहेत. दुसरीकडे विरोधामुळे गुजरातनंतर बिहारच्या बहुतांश थिएटर मालकांनी चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे करणी सेनेने दावा केला आहे की, पद्मावतच्या रिलीजच्या विरोधात राजपूत समाजाच्या 1908 महिलांनी चित्तोडगडमध्ये जोहर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केले आहे. पद्मावत 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. 


थिएटर मालकांचे गृहमंत्रालयाला पत्र 

सिनेमा ओर्नस अँड एक्झिबिटर्स असोसीएशन ऑफ इंडिया (COAEI) ने गृह मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. त्यात पद्मावत रिलीज दरम्यान थिएटर्सच्या बाहेर सुरक्षा वाढवण्याची विनंती केली आहे. 
- असोसिएशनने थिएटर्सला सल्ला दिला आहे की, सुरक्षेची खात्री मिळाल्यानंतरच चित्रपट रिलीज करावा. 

 

पद्मावतबाबत 7 राज्यांत परिस्थिती काय?, वाचा पुढील स्लाइड्सवर..

बातम्या आणखी आहेत...