आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मावतवर राहुल म्हणाले, BJP देशभरात आग लावतेय; वाचा इतर महत्वाच्या प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / नवी दिल्ली - देशव्यापी विरोध, निदर्शने आणि धमक्यांसह बंदचे सत्र सुरू असतानाच संजय लीला भंसाळी यांचा चित्रपट पद्मावत गुरुवारी रिलीझ करण्यात आला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन 7 हजार स्क्रीन्सवर करण्यात आले आहे. यासोबतच अनेक राज्यांमध्ये विरोध आणि निदर्शनांचे वृत्त समोर येत आहेत. राजपूत करणी सेनेने फिल्मच्या विरोधात गुरुवारी बंदचे आवाहन केले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी यासाठी भाजपला जबाबदार धरले आहे. तर केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी लहान मुले आणि महिलांवर हल्ले कदापी सहन केले जाणार नाहीत अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

 

राहुल म्हणाले...
- पद्मावतच्या विरोधात लहान मुले आणि महिलांवर होणाऱ्या हल्ल्यांचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तीव्र निषेध केला आहे. 
- त्यांनी ट्वीट केल्याप्रमाणे, "लहान मुलांच्या विरोधात हिंसाचार कदापी सहन केला जाणार नाही. तो कुठल्याही परिस्थितीत योग्य ठरवता येणार नाही. भाजप साऱ्या देशात आग लावण्यासाठी हिंसाचार आणि द्वेषचा वापर करत आहे."

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, केंद्रीय मंत्री, स्वामी आणि शाहिदसह इतरांच्या प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...