आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वकिली करतांना सुप्रीम कोर्ट न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला, कोण आहेत इंदू मल्होत्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ इंदू मल्होत्रा यांची सुप्रीम कोर्ट जज पदी नियुक्तीची कॉलेजियमची शिफारस मंजूर केली आहे. लवकरच यासंदर्भातील अध्यादेश जारी केला जाणार आहे. पुढील महिन्यात त्या सुप्रीम कोर्ट जज म्हणून शपथ ग्रहण करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॉलेजियमने इंदू मल्होत्रा यांच्यासोबत उत्तराखंड हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश के.एम.जोसेफ यांच्या नावाचीही शिफारस केली होती. त्यांच्या नावाचा कॉलेजियमने पुनर्विचार करावा असे केंद्राने म्हटले आहे. 

 

कोण आहे इंदू मल्होत्रा 
- इंदू मल्होत्रा या 30 वर्षांपासून सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करत आहेत. 
- 61वर्षीय इंदू मल्होत्रा या पहिल्या महिला आहेत ज्या वकीली करत असताना त्यांची थेट सुप्रीम कोर्ट न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 
- सुप्रीम कोर्टाच्या 68 वर्षांच्या इतिहासातील त्या सातव्या महिला जज असतील. त्यांच्या आधी फातिमा बीवी, सुजाता मनोहर, रुमा पाल, ज्ञानसुधा मिश्रा, रंजना देसाई आणि भानुमती या सुप्रीम कोर्ट जज बनल्या होत्या.  
- सध्या सुप्रीम कोर्टातील 24 न्यायाधीशांमध्ये आर. भानुमती या एकमेव महिला जज आहेत. 

 

सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील
- इंदू मल्होत्रा यांची ऑगस्ट 2007 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या वरिष्ठ वकील म्हणून नेमणूक झाली होती. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या दुसऱ्या महिला वकील होत्या. 

दिल्लीत झाले शिक्षण 
- इंदू मल्होत्रा यांचा जन्म 1956 मध्ये बंगळुरुत झाला. त्यांनी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले. इंदू मल्होत्रा यांनी राज्यशास्त्रातून पदव्यूत्तर पदवी संपादन केली होती. 
- दिल्लीतील विवेकानंद कॉलेज, मिरांडा हाऊस महाविद्यालय येथे त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. 
- इंदू मल्होत्रा यांनी 1983 मध्ये वकिली कारकिर्दीस सुरुवात केली. त्यांचे संपूर्ण कुटुंब वकिली करते. 
- मल्होत्रा यांचे वडील ओ.पी.मल्होत्रा ज्येष्ठ वकील आहे. त्यांचा मोठा भाऊ आणि बहिणही वकील आहे.

बातम्या आणखी आहेत...