आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Section 377:प्रजननासाठी केला तरच सेक्स नैसर्गिक का? जस्टीस नरीमन यांनी उपस्थित केला प्रश्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टात समलैंगिकता हा गुन्हा आहे की नाही, यासंदर्भातील खटल्यावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी या खटल्यावरील सुनावणीदरम्यान जस्टिस नरीमन म्हणाले की, निसर्गाचा नियम काय आहे? केवळ प्रजननासाठी सेक्स करावा हा निसर्गाचा नियम आहे का? जर यापेक्षा वेगळ्या प्रकारे संबंध ठेवले जात असतील तर ते निसर्गविरोधी आहेत का? आपण NALSA निर्णयात ट्रान्सजेंडरनाही सेक्सची मान्यता दिली आहे. सरन्यायाधीश म्हणाले की, सेक्स आणि लैंगिक प्राधान्य याची सरमिसळ करायला नको. चा चुकीचा प्रयत्न असेल. जस्टीस नरीमन म्हणाले की, जर कलम 377 घटनाबाह्य आहे यावर आपण समाधानी असू तर ते रद्द करणे आपले कर्तव्य आहे. 

 

सरन्यायाधीश म्हणाले की, 377 पूर्णपणे रद्द केल्यास अराजकता माजेल. हे प्रकरण पुरुषाचे पुरुषाबरोबर आणि स्त्रीचे स्त्रीबरोबर सहमतीने असलेले संबंध यावर आधारीत आहे. 

 

सुप्रीम कोर्टाच्या पाच जणांच्या पीठासमोर मंगळवारी कलम 377 संदर्भातील सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात या विषयावर सुप्रीम कोर्टात भूमिका मांडली होती. समलैंगिक संबंधांचा समावेश गुन्हेगारी प्रकरणांमध्ये असावा की नाही याबाबत भूमिका घेणे केंद्र सरकारला शक्य नसल्याचे केंद्राने सुप्रीम कोर्टाला सांगितले होते. केंद्र सरकार सुप्रीम कोर्टावर हा निर्णय सोडत असल्याचे सरकारने म्हटले होते. त्यानुसार या प्रकरणावर कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...