आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्स 30 अंडर-30 : यंग अचिव्हर्समध्ये बुमराह, हरमनप्रीत, भूमीसह मिथिलाही, 10 महिला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - फोर्ब्स इंडियाने 30 अंडर ची यादी जारी केली आहे. आपआपल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या 30 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 30 तरुणांचा या यादीत समावेश आहे. या यादीत सर्वाधिक 4 नावे क्रीडा जगतातील आहेत. तर 3 नाने मनोरंजन क्षेत्रातील आहेत. त्यात भूमी पेडणेकर, अभिनेता विकी कौशल, क्रिकेटर जसप्रित बुमराह, महिला क्रिकेटर हरमनप्रित कौर आणि शूटर हिना सिद्धू यांचा समावेश आहे. 


दुसऱ्यांदा यादीत 10 महिलांची नावे 
- 2011 पासून फोर्ब्सने 30 अंडर-30 यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. तर 2014 पासून फोर्ब्स इंडियाची ही यादी जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे. त्यात भारताच्याच 30 तरुणांची निवड केली जाते. त्यात 9 स्थानांवर एकूण 10 महिलांची नावे यादीत आहेत. 
- एका स्थानावर 2 महिला जान्हवी जोशी आणि नुपुरा किर्लोस्कर आहेत. दुसऱ्यांदा लिस्टमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक महिलांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. 
- यापूर्वी 2015 मध्ये सर्वाघिक 11 स्थानांवर 14 महिलांची नावे होती. यावर्षी या यादीसाठी कॅटेगरीमध्ये 300 हून अधिक अर्ज आलेले आहेत. 
- फोर्ब्स एडिटर्सच्या टीमने फायनल-30 निवडले. ज्यांचे वय 31 दिसंबर 2017 पर्यंत 30 वर्षांपेक्षा कमी आहे, अशांनाच निवडण्यात आले आहे. 

 

12 स्थानांवर एकापेक्षा अधिक नावे 
- लिस्टमध्ये 30 पैकी 12 स्थाने अशी आहेत ज्याठिकाणी एकापेक्षा जास्त जणांची नावे आहेत. 
- 4 नावे क्रीडा जगताशी संबंधित आहेत. बुमराह, हरमनप्रित, हिना सिद्धू आणि सवित पुनिया. 
- 3 मनोरंजन क्षेत्रातील नावे आहेत. विकी कौशल, भूमी पेडनेकर आणि मिथिला पालकर. 
- एक गायक - जुबिन.
- 9 स्थानांवर  10 महिलांची नावे 
- टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया-कम्युनिकेशन, इंटरप्रिन्योरशिप, हेल्थ केअर, फूड-हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, फॅशन, ई-कॉमर्स आणि डिझायनिंग अशा क्षेत्रातील 2-2 नावे आहेत. 


तधी किती महिला?
2018- 9 
2017- 7 
2016- 7 
2015- 11 
2014- 6

 

बातम्या आणखी आहेत...