आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोर्ब्स लिस्ट: अॅमेझॉनचे जेफ बेजोस जगात सर्वात श्रीमंत, मुकेश अंबानी 19व्या क्रमांकावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - फोर्ब्सच्या दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या अब्जाधीशांच्या यादीत अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती 112 अब्ज डॉलर (तब्बल 7.5 लाख कोटी रुपये) आहे. यासोबतच ते 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त संपत्ती असणारे पहिले अब्जाधीशही ठरले आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सना मागे टाकले आहे. या यादीत मुकेश अंबानी 40.1 अब्ज डॉलर (तब्बल 2.61 लाख कोटी रुपये) संपत्तीसह 19व्या स्थानावर आहेत. 

 

अंबानींची एका स्थानाने प्रगती
- मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 17 अब्ज डॉलर ( 1.1 लाख कोटी रुपये) ची वाढ झाली आहे.
- मागच्या वेळी ते 33 व्या क्रमांकावर होते. आता 14 क्रमांकांची प्रगती केली आहे.

 

सर्वात जास्त अब्जाधीश अमेरिकेत, चीन दुसऱ्या क्रमांकावर

- या यादीत जगभरातील 2 हजार 208 अब्जाधीशांचा समावेश आहे. सर्वात जास्त अमेरिकेत 585 अब्जाधीश आहेत. 373 अब्जाधीशांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिस्टमध्ये 102 भारतीय अब्जाधीश आहेत.

 

जगभरात हे आहेत TOP-5

अब्जाधीश संपत्ती रँक
जेफ बेजोस 112 अब्ज डॉलर 1
बिल गेट्स 90 अब्ज डॉलर 2
वॉरेन बफे 84 अब्ज डॉलर 3
बर्नार्ड अर्नाल्ट 72 अब्ज डॉलर 4
मार्क झुकरबर्ग 71 अब्ज डॉलर 5

- या यादीत टॉप-10 मध्ये एकही महिला नाही आहे. अमेरिकी रिटेल चेन वाॅलमार्टच्या एलिस वाल्टन 16व्या स्थानावर असणाऱ्या पहिल्या महिला आहेत.

टॉप-10 भारतीय

अब्जाधीश संपत्ती रँक
मुकेश अंबानी 40.1 अब्ज डॉलर 19
अझीम प्रेमजी 18.8 अब्ज डॉलर 58
लक्ष्मी निवास मित्तल 18.5 अब्ज डॉलर 62
शिव नडार 14.6 अब्ज डॉलर 98
दिलीप सांघवी 12.8 अब्ज डॉलर 115
कुमार बिर्ला 11.8 अब्ज डॉलर 127
उदय कोटक 10.7 अब्ज डॉलर 143
राधाकिशन दमाणी 10 अब्ज डॉलर 151
गौतम अडाणी 9.7 अब्ज डॉलर 154
सायरस पूनावाला 9.1 अब्ज डॉलर 170

 

बातम्या आणखी आहेत...