आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचे 7 जवान टिपले, पाच अतिरेक्यांचाही खात्मा! सैन्याची मोठी कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंडियन आर्मी डेच्या दिवशी पाकने केेलेल्या आगळीकीला भारतीय जवानांचे चोख उत्तर. - Divya Marathi
इंडियन आर्मी डेच्या दिवशी पाकने केेलेल्या आगळीकीला भारतीय जवानांचे चोख उत्तर.

श्रीनगर/नवी दिल्ली- भारताच्या लष्करदिनी सुरक्षा दलांनी मोठा पराक्रम गाजवला आहे. जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सोमवारी संघर्षविरामाचे उल्लंघन करत असलेल्या पाकिस्तानच्या एका मेजरसह ७ जवानांना लष्कराने प्रत्युत्तराच्या कारवाईत ठार केले. या कारवाईत पाकचे ४ जवान जखमीही झाल्याचा दावा भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. 


दुसरीकडे उरी सेक्टरमध्ये घुसखाेरीचा प्रयत्न करणाऱ्या ५ अतिरेक्यांना लष्कराने कंठस्नान घातले. यंदा १५ दिवसांतच ११ अतिरेक्यांचा भारताने खात्मा केला अाहे. दरम्यान, अतिरेक्यांच्या ४ सहकाऱ्यांना अटक झाली. 


भदाणंेच्या मृत्यूचा बदला

मेंढर सेक्टरच्या नियंत्रण रेषेवर पाक लष्कराने रविवारी रात्रीपासून गाेळीबार केला. एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, प्रत्युत्तरात पाकची एक पोस्ट उद्््ध्वस्त व ७ जवानही ठार झाले. राजौरीत शनिवारी पाकच्या गोळीबारात धुळ्याचे सुपुत्र जवान याेगेश भदाणे शहीद झाले होते. दुसरीकडे, पाकने आपले ४ जवान ठार झाल्याचे सांगत भारताचेही ३ सैनिक टिपल्याचा दावा केला.


घुसखोरी भारताने उधळली

लष्कराने जैशच्या ५ अतिरेक्यांना टिपत यंदाची पहिली घुसखोरी उधळली. सुरक्षा दलांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र, त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. चकमकीत सर्वांना टिपण्यात आले. 

 

 

सप्टेंबरमध्येही उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उद्धवस्त
- 28 सप्टेंबरला काश्मीरमधील उरी येथील जोरावर भागात सुरक्षा रक्षकांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला होता. त्यावेळी 3 दिवसांमध्ये काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते. 
- 11 डिसेंबरमध्ये जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये सुरक्षा रक्षकांनी केलेल्या एन्काऊंटरमध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले. डीजीपी वैद म्हणाले, मृत्यूमुखी पडलेले तिघेही पाकिस्तानचे नागरिक होते. 
- 5 डिसेंबरला साऊथ काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांनी लष्कर-ए-तोएबाच्या 3 दहशतवाद्यांना ठार केले होते. त्यातील दोघे पाकिस्तानी नागरिक होते.

 

काश्मीरचे दहशतवादी आपले बांधव - आमदार मीर

- 11 जानेवारीला पीडीपी आमदार एजाज अहमद मीर यांनी म्हटले होते, की असे कित्येक दिवस चालत राहाणार आहे? आम्ही 200 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. हा सिलसिला असाच चालत राहील. हे थांबवण्यासाठी कोणालातरी पुढे यावे लागेल. काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. त्याला राजकारण्यांनीच सोडवले पाहिजे. 
- मीर म्हणाले होते, 'जे काश्मीरी आहेत ते आमचे बांधव आहेत. मग ते मिलिटंट असले तरी. आमचे जे जवान शहीद होतात त्यांच्या कुटुंबियांसोबतही आमची सहानुभूती आहे.'
काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील सत्ताधारी पीडीपीच्या एका आमदारांनी दहशतवादी आपले बांधव आहेत, त्यांना मारु नये असे विधान केले होते.

 

2017 मध्ये काश्मीरमध्ये 337 दहशतवादी घटना, 230 ठार; 75 जवान शहीद
- जम्मू-काश्मीरमध्ये 2017 या वर्षात 337 दहशतवादी घटना घडल्याचे समोर आले आहे. येथे सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत 203 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवाद्यांच्या विरोधातील या लढाईत जम्मू-काश्मीर पोलिस आणि लष्कराचे 75 जवान शहीद झाले आहेत. ही माहिती 19 डिसेंबरला केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी लोकसभेत दिली होती. 
- दुसरीकडे पूर्वोत्तर राज्यात एकूण 97 जणांचा मृत्यू झाला होता. येथे सुरक्षा रक्षकांनी माओवाद्यांविरोधात केलेल्या ऑपरेशनमध्ये 51 जणांना कंठस्नान घातले. तर 12 जवान शहीद झाले.

 

पाक सुधारला नाही तर ‘दुसरा पर्याय’ : रावत
काश्मिरात कारवाई होत असताना दुसरीकडे नवी दिल्लीत लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत पाकला सज्जड दम भरत होते. ७० व्या लष्करदिनी ते म्हणाले, पाकिस्तान सुधारला नाही तर भारत दुसरा पर्याय वापरण्यास मागेपुढे पाहणार नाही. पाक लष्कर सातत्याने संघर्षविरामाचे उल्लंघन करत अतिरेक्यांना भारतात घुसखोरीसाठी मदत करत आहे.

बातम्या आणखी आहेत...