आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर, मोदींसोबत वाराणसीला जाणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन त्यांची पत्नी ब्रिगिट यांच्या राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. - Divya Marathi
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन त्यांची पत्नी ब्रिगिट यांच्या राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले.

नवी दिल्ली - फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन पत्नी ब्रिगिटसोबत तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. शुक्रवारी रात्री भारतात पोहोचलेल्या मॅक्रॉन यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोटोकॉल मोडून विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी गेले होते. शनिवारी सकाळी ते राष्ट्रपती भवनात पोहोचचे येथे राष्ट्रपीत रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आजच उभय देशांमध्ये सागरी सुरक्षा आणि दहशतवादसारख्या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होईल. या दौऱ्यात मॅक्रॉन यांचे पंतप्रधान मोदी त्यांचा मतदारसंघ वाराणसीमध्ये जंगी स्वागत करणार आहेत. नावेत बसवून त्यांना गंगेची सफर घडवणार आहेत. त्यासोबतच घाटावर घेऊन जातील. या तयारीचा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जातीने आढावा घेतला आहे. याआधी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे वाराणलीला आले होते. 

 

असा असेल मॅक्रॉन यांचा तीन दिवसांचा दौरा 

- दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी आणि मॅक्रॉन संयुक्तरीत्या सौर ऊर्जा आघाडीच्या पहिल्या बैठकीचे उद्धाटन करतील. त्याशिवाय व्यापार वाढवण्यासाठी फ्रान्स-भारत सीईओ मंचची गोलमेज बैठकही होईल. तीत दोन्ही देशांचे वरिष्ठ उद्योगपती सहभागी होतील.

- विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हे वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात मॅक्राॅन यांचे भव्य आदरातिथ्य करणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यानंतर वाराणसीला जाणारे मॅक्राॅन हे दुसरे राष्ट्रप्रमुख असतील.

- मोदी-मॅक्राॅन गंगेच्या घाटावर फेरफटकाही मारतील. त्याशिवाय गंगा नदीत नावेतूनही प्रवास करतील. त्याद्वारे मोदी नमामि गंगे प्रकल्पाचे ब्रँडिंगही करतील.

 

सागरी संरक्षणावर चर्चा 

- शनिवारी दिल्लीत दोन्ही देशांत द्विपक्षीय चर्चा होईल. संरक्षण, नौका परिवहन, अंतराळ, सुरक्षा, ऊर्जा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. मेक इन इंडियाशी संबंधित अनेक मोठे संरक्षण करारही होऊ शकतात. दोन्ही देशांचे व्यावसायिक, राजकीय आणि व्यूहात्मक संबंध आणखी मजबूत होतील.

 

भारताला स्कॉर्पिन पाणबुडी विकण्याची फ्रान्सची इच्छा
- फ्रान्सच्या माध्यमांनुसार, भारताच्या या दौऱ्यात मोठा संरक्षण करार होईल, अशी मॅक्राॅन यांची अपेक्षा आहे. रफाल विमान करारावर वाद झाला असतानाच भारताला 100 ते 150 रफाल विमानांची विक्री करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याशिवाय स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी भारताला विकण्यासही ते इच्छुक आहेत.

- मॅक्रॉन यांच्यासोबत फ्रान्सच्या अव्वल संरक्षण कंपन्यांचे सीईओ येत आहेत. त्यात डसाल्ड एव्हिएशनचे प्रमुख एरिक, नॉवेल ग्रुपचे सीईओ हर्व, थेल्सचे सीईओ पॅट्रिक सीने आणि सॅफरन ग्रुपचे सीईओ फिलिप यांचा समावेश आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, पंतप्रधानांनी केले उत्साहात स्वागत...

बातम्या आणखी आहेत...