आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांचा आजपासून भारताचा दौरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा तीन दिवसांचा भारत दौरा शनिवारपासून सुरू होईल. ते शुक्रवारी रात्रीच भारतात दाखल होती. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॅक्राॅन यांच्यात द्विपक्षीय संबंधांवर चर्चा होईल.


दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी आणि मॅक्रॉन संयुक्तरीत्या सौर ऊर्जा आघाडीच्या पहिल्या बैठकीचे उद्धाटन करतील. त्याशिवाय व्यापार वाढवण्यासाठी फ्रान्स-भारत सीईओ मंचची गोलमेज बैठकही होईल. तीत दोन्ही देशांची वरिष्ठ उद्योगपती सहभागी होतील. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हे वाराणसी या आपल्या संसदीय मतदारसंघात मॅक्राॅन यांचे भव्य आदरातिथ्य करणार आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यानंतर वाराणसीला जाणारे मॅक्राॅन हे दुसरे राष्ट्रप्रमुख असतील. मोदी-मॅक्राॅन गंगेच्या घाटावर फेरफटकाही मारतील. त्याशिवाय गंगा नदीत नावेतूनही प्रवास करतील. त्याद्वारे मोदी नमामि गंगे प्रकल्पाचे ब्रँडिंगही करतील. शनिवारी दिल्लीत दोन्ही देशांत द्विपक्षीय चर्चा होईल. संरक्षण, नौका परिवहन, अंतराळ, सुरक्षा, ऊर्जा यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. मेक इन इंडियाशी संबंधित अनेक मोठे संरक्षण करारही होऊ शकतात. दोन्ही देशांचे व्यावसायिक, राजकीय आणि व्यूहात्मक संबंध आणखी मजबूत होतील.

भारताला स्कॉर्पिन पाणबुडी विकण्याची फ्रान्सची इच्छा
फ्रान्सच्या माध्यमांनुसार,भारताच्या या दौऱ्यात मोठा संरक्षण करार होईल, अशी मॅक्राॅन यांची अपेक्षा आहे. रफाल विमान करारावर वाद झाला असतानाच भारताला १०० ते १५० रफाल विमानांची विक्री करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याशिवाय स्कॉर्पिन श्रेणीची पाणबुडी भारताला विकण्यासही ते इच्छुक आहेत. मॅक्राँ यांच्यासोबत फ्रान्सच्या अव्वल संरक्षण कंपन्यांचे सीईओ येत आहेत. त्यात डसाल्ड एव्हिएशनचे प्रमुख एरिक, नॉवेल ग्रुपचे सीईओ हर्व, थेल्सचे सीईओ पॅट्रिक सीने आणि सॅफरन ग्रुपचे सीईओ फिलिप यांचा समावेश आहे.

 

बातम्या आणखी आहेत...