आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंदूर - पाकिस्तानकडून सुमारे अडीच वर्षांपूर्वी भारतात परत आणण्यात आलेल्या दिव्यांग गीताच्या लग्नाची तयारी सरकारने केली आहे. प्रथमच भारत सरकार एखादे लग्न लावून देत आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज मुलगा शोधणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयच त्याला घर, नोकरी आणि संसारासाठी साहित्य देणार आहे. गीतासाठी वधू वर मेळाव्यांपासून ते सोशल साइट्सपर्यंत अनेक ठिकाणी मुलगा शोधला जात आहे. आतापर्यंत 12 तरुणांनी गीताबरोबर लग्नाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यात लेखकांपासून ते पुरोहितांपर्यंत अनेकांचा समावेश आहे.
गीता प्रसिद्ध असल्याने, करू इच्छितात लग्न
गीता इंदूरच्या गुमाश्ता नगर येथील मूक-बधिर संघटनेच्या देखरेखीत आहे. संघटनेच्या मोनिका पंजाबी यांनी सांगितले की, अेक तरुणांनी फोन करत गीताशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही बायोडाटाही मागवले होते. ते परराष्ट्र मंत्रालयात पाठवण्यात आले आहेत. युवकांनी गीताशी लग्न करण्याची वेगवेगळी कारणे सांगितली आहेत. बहुतांश तरुण ती प्रसिद्ध असल्याने तिच्याशी लग्न करू इच्छित आहेत.
इच्छुकांना विचारले जात आहेत हे 2 प्रश्न
1. गीताबरोबरच लग्न करण्याची इच्छा का आहे?
2. कुटुंबीयदेखिल या लग्नासाठी तयार आहेत का?
तरुणांची उत्तरे अशी..
- सांवेरचे राहणारे आणि पेशाने पुरोहित असलेले पंडित महेश दास बैरागी यांनी सांगितले की, पाकिस्तानात राहूनही गीताने हिंदू धर्म सोडलेला नाही. तिची साइन लँग्वेजही चांगली आहे. मला साधी मुलगीच हवी होती. कुटुंबीयांनाही या लग्नाबद्दल काही अडचण नाही.
- अहमदाबादच्या रेस्तरॉमध्ये काम करणाऱ्या रितेशने सांगितले की, इंटरनेटवर गीताचे व्हिडिओ पाहिले. ती प्रसिद्ध आहे. अगदी साधी आहे. मी गीताशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही आई वडिलांशी बोलू शकता.
- इंदूरच्या मिठाईच्या दुकानावर काम करणाऱ्या सुरेश सिसोदियाने सांगितले की, गीता प्रसिद्ध आहे. विमानाने भारतात आली होती. सुषमाजी स्वतः तिचे लग्न लावून देणार आहेत. कुटुंबीयांनाही काही अडचण नाही.
सर्व तयारी परराष्ट्र मंत्रालय करणार
जिल्हाधिकारी निशांत वरवडे यांनी सांगितले की, लग्नाच्या प्रकरणाचा अंतिम निर्णय गीताचाच असेल. पण त्याची सगळी तयारी परराष्ट्र मंत्रालय करमार आहे. आम्ही त्यांच्या निर्देशानुसारच काम करू.
15 कुटुंबांनी केला मुलगी असल्याचा दावा
- आतापर्यंत बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगाणा आणि मध्य प्रदेशमधून सुमारे 15 कुटुंबांनी गीता त्यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे.
- या कुटुंबांना गीताची भेटही घालून देण्यात आली. सर्वांच्या डीएनएची चाचणीही करण्यात आली. पण कोणाचाही डीएनए गीताबरोबर मॅच झाला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.