आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅझेट्स, कामाच्या ताणामुळे 66% लोकांची झोप अपूर्ण; आज जागतिक निद्रा दिन, फिलिप्सचे सर्वेक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतीक फोटो... - Divya Marathi
सांकेतीक फोटो...

नवी दिल्ली- जगभरातील १० कोटी, भारतातील ६६% लोकांना पुरेशी झोप मिळत नाही. तरीही ते झोपेपेक्षा व्यायामाला प्राधान्य देत आहेत. गॅझेट्स व इतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कमी झोप होत असल्याचे ३२ टक्के लोकांना वाटते तर १९ टक्के लोकांच्या मते कामाच्या अनियमित वेळांमुळे झोपेवर परिणाम होत आहे. जागतिक निद्रा दिनाच्या निमित्ताने फिलिप्स इंडिया लिमिटेड कंपनीने १३ देशांतील १८ वर्षांवरील १५ हजार लोकांचे सर्वेक्षण केले. यात ही माहिती समोर आली आहे. 


भारत, चीन, अमेरिका, ब्रिटेन, जर्मनी, पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, मेक्सिको, ब्राझील, जपान आदी देशांतील लोकांना त्यांच्या झोपण्याच्या सवयीविषयी विविध प्रश्न विचारण्यात आले. सर्वेक्षणातील ६७% लोकांच्या मते, त्यांना चांगली झोप तर पाहिजे पण त्याला प्राधान्य देण्याची गरज नाही. आजारामुळे ६१% लोकांच्या झोपेवर परिणाम होत आहे. यात २६ टक्के लोकांना अनिद्रा आणि २१ टक्के लोक घोरण्यामुळे हैराण आहेत. झोप न झाल्यामुळे ४६ टक्के लोक थकत असून त्यांच्यातील चिडचिडपणा वाढला आहे. ४० टक्के लोकांची एकाग्रता कमी होत आहे.