आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅटरी शोधण्यासाठी खोदले शेत, पण मिळाली लव्ह मॅरेज केलेल्या या तरुणीची डेडबॉडी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रियकराशी लग्न करणाऱ्या प्रियांचा मृतदेह सकाळी एका शेतात या अवस्थेत आढळला. - Divya Marathi
प्रियकराशी लग्न करणाऱ्या प्रियांचा मृतदेह सकाळी एका शेतात या अवस्थेत आढळला.

बेगूसराय (बिहार) - आई वडिलांच्या विरोधात जाऊन प्रियकराशी लग्न करणाऱ्या प्रियांकाचा मृतदेह सोमवारी सकाळी एका शेतात आढळला. प्रियांकाची हत्या करून तिचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. सोमवारी सकाळी एक अज्ञात मृतदेह आढळला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ती सुधीर मिश्रा यांनी 22 वर्षांची मुलगी प्रियांका कुमारी असल्याचे स्पष्ट झाले. तिच्या कुटुंबीयांनी तिची ओळख पटवली. प्रियांकाने तिचा प्रियकर पती आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हुंड्यासाठी छळ आणि लैंगिक शोषण तसेच मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत एक गुन्हा दाखल केलेला होता. 


ई-रिक्षाची बॅटरी शोधताना आढळला मृतदेह 
- येथील नौलखा मंदिराच्या शेतात रविवारी सायंकाळी राजकुमार याला शेत खोदलेले दिसले. 
- सोमवारी सकाळी त्याच्या शेजारच्या व्यक्तीच्या ई-रिक्षाची बॅटरी चोरीला गेली होती. ही याठिकाणी पुरली असावी अशी शंका आल्याने त्याने शेत खोदायला सुरुवात केली. 
- पण थोडे खोदकाम झाल्यानंतर त्याला त्याठिकाणी मृतदेह असल्याचा संशय आला. त्याने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर जमिनीचे खोदकाम करण्यात आले, तर त्याठिकाणी मृतदेह आढळला. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला आहे. 


प्रेमाची शिक्षा तर नाही...
- प्रियांका कुमारीने तिच्याच गावातील अशोक सिंहचा मुलगा कुणाल कुमार याच्याशी घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केले होते. 2017 मध्ये एका मंदिरात तिने लग्न केले. 
- डिसेंबर 2017 पर्यंत प्रियांका पती कुणालबरोबर रांची आणि दिल्लीत राहिली. यादरम्यान प्रियांकाला अचानक कुणालने धमक्या द्यायला सुरुवात केली. तिचे सासरचे लोकही तिला घरात ठेवायला तयार नव्हते. 
- प्रियांकाला कुणालच्या दुसऱ्या लग्नाबाबत कळल्यानंतर तिने बेगूसराय पोलिसांत हुंड्यासाठी छळ, लैंगिक शोषण आणि मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर कुणालचे लग्न थांबले होते. 


कुणालचे कुटुंबीय होते नाराज.. 
- प्रियांका पतीवर केस केल्यानंतर सासरीही गेली नव्हती आणि माहेरीही गेली नव्हती. 
- कुणालचे कुटुंबीय लग्नाने आनंदी नव्हते असे प्रियांकाने पोलिसांत सांगितले होते. 
- कुणाल तिचा छळ करत होती. ती गर्भवतीही राहिली पण औषध खाऊ घालून तिचा गर्भपात करण्यात आला होता. 


पुढे वाचा, 18 फेब्रुवारीला होता वाढदिवस... 

 

बातम्या आणखी आहेत...