आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरगच्च बसमध्ये विद्यार्थिनीशेजारी बसून करत होता अश्लिल कृत्य, तिने थेट पोस्ट केला Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वजनिक ठिकाणी अत्याचाराच्या घटनांमध्ये रोज वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. रोज हजारो तरुणींना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो. नुकतीच नवी दिल्लीतील अशीच एक घटना उघड झाली आहे. एका बसमध्ये एक व्यक्ती विद्यार्थिनीशेजारी बसून अश्लिल चाळे करत होता. या मुलीने या घटनेचा व्हिडिओच थेट सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडिओ अत्यंत बीभत्स आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीच्या एका विद्यार्थिनीने प्रवाशांनी भरगच्च भरलेल्या एका बसमध्ये हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. 


यामुळे तरुणीने थेट पोस्ट केला व्हिडिओ...
शेजारी बसलेल्या व्यक्तीचे अश्लिल चाळे पाहून तरुणीला घृणा आली. तिने याबाबत आरडाओरडाही केला. पण बसमधील कोणीही या तरुणीच्या मदतीला धावून आले नाही. त्यामुळे तिने थेट व्हिडिओ शूट करून तो पोस्ट करण्याचा निर्णय घेतला.  7 फेरब्रुवारीला ही घटना घडली असून तिचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 


या व्यक्तीने विद्यार्थिनीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही तिने केलेला आहे. पोलिस या व्यक्तीचा शोध घेत असून अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. तरुणीने या प्रकारानंतर पोलिसांत तक्रार केली होती. 

 

बातम्या आणखी आहेत...