आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 वर्षांच्या मुलीने नाकारला Propose,गुंडाने दुकानात शिरून मारले, मदतीसाठी ओरडत राहिली पण कोणी आले नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दक्षिण दिल्लीच्या वरदळ असलेल्या भागात एका अल्पवयीन मुलीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी परिसरातील गुंड असल्याची माहिती मिळतेय. त्याने तरुणीला दुकानात शिरून मारहाण केली आणि त्यानंतर तिला फरफटत सोबतही घेऊन गेला. दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात घटना कैद झाली आहे. या मुलीने लग्नासाठी नकार दिल्याने तिला गुंडाने अशी मारहाण केली. या घटनेच्या वेळी दुकानात आणि बाहेरही अनेक लोक होते. मुलगी मदतीसाठी जोराने ओरडत होती, पण कोणीही तिला वाचवायला आले नाही. घटना काही दिवसांपूर्वीची आहे, पण ती आता समोर आली. सीसीटिव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...