आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS झालेली तपस्या म्हणाली- मुलींवर आपला हक्क सांगतात मुलं, हा माइंडसेट बदलण्याची गरज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तपस्याने देशात 23वी रँक मिळवली तर मध्यप्रदेशात ती पहिली आली आहे. - Divya Marathi
तपस्याने देशात 23वी रँक मिळवली तर मध्यप्रदेशात ती पहिली आली आहे.

नवी दिल्ली - भारतीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील तपस्या परिहार देशात 23वी तर राज्यातील टॉपर ठरली आहे. महिलांविरोधात होणारे अत्याचार आणि हिंसा रोखण्यासाठी मुलांचा माइंडसेट बदलावा लागण्याची गरज तपस्याने व्यक्त केली. मुलं ही मुलींना आपला हक्क मानतात, त्यांच्यावर आपलाच अधिकार आहे ही त्यांची मानसिकता असते. हा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. आम्हाला समानता आणावी लागणार आहे. आयएएस झालेली तपस्या मनमोकळेपणाने सांगत होती. 

 

मध्यप्रदेशातील शेतकरी कुटुंबातील तपस्याने राज्यातून पहिला क्रमांक मिळवला आहे. शेतकरी वडील आणि सरपंच आई अशा परिवारातील तपस्याचा संयुक्त कुटुंबावर विश्वास आहे. तिच्याशी केलेली खास बातमीच DivayMarathi.Com वाचकांसाठी...

 

> आयएएस इंटरव्ह्यू पॅनलमध्ये किती लोक होते, मुलाखत किती वेळ चालली, याबद्दल तपस्या म्हणाली, 'पाच तज्ज्ञांचे पॅनल होते. त्याचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भोसले होते. मुलाखत जवळपास 25-30 मिनिट चालली. त्यांनी मला 25 प्रश्न विचारले.'

> मुलाखतीत असा एखादा प्रश्न होता, जो तुला कायम लक्षात राहिल यावर तपस्या म्हणाली, 'मुलाखत जवळपास संपत आली होती. तेव्हा पॅनलचे अध्यक्ष निवृत्त एअर मार्शल भोसले सरांनी एक प्रश्न विचारला. त्यांनी विचारले, यूआर आयएएस ऑफिसर नाऊ, तर तुला मुंबईचे डीजी सेक्यूरिटी केले तर 26/11 सारखा हल्ला झाल्यानंतर तो कसा थांबवणार. मी म्हणाले, यासाठी एक टीम तयार करेल. ज्यामध्ये नवे आणि जुणे अधिकारी असतील. 26/11 च्या रिपोर्टची स्टडी करेल आणि त्यात काय कमतरता राहिली आणि कुठे चूक झाली हे पाहिल. त्यानंतर स्ट्रॅटजी तयार करेल. या विषयावर त्यांच्यासोबत डिस्कशनही झाले.'

> मध्यप्रदेशात 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. या कायद्याकडे तु कशी पाहाते, यावर तपस्या म्हणाली, 'कायदा ठिक आहे. मात्र शिक्षा जास्तित जास्त गुन्हेगारांना मिळाली पाहिजे यावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. वास्तविक महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे मुळ हे मुलांच्या माइंडसेटमध्ये असते. ते मुलींना कमकुवत आणि आपला हक्क समजतात. हा माइंडसेट बदलण्याची गरज आहे. आम्हाला मुलगा आणि मुलगी यांच्यात समानता आणावी लागणार आहे. मुलांना आत्मनिर्भर बनावे लागेल. याची सुरुवात झाली आहे, मात्र अजून वेळ लागणार आहे.'

> तपस्या मध्यप्रदेशची असल्यामुळे तिने एमपी कॅडरला पसंती दिली आहे. यापुढे काय करणार या प्रश्नावर ती म्हणाली, जी जबाबदारी मिळे ती प्रामाणिकपणे पार पाडायची आहे. 

बातम्या आणखी आहेत...