आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची मुलगी आहे 18 वर्षीय सुवर्णकन्या हिमा दास, पीटी उषा, मिल्खा यांना पछाडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताची 18 वर्षीय अॅथलिट हिमा दास (Hima Das) हिने एक नवा इतिहास रचला आहे. फिनलंडच्या टॅमेपेयर शहरात आयोजित IAAF विश्व अंडर-20 अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (IAAF World U20 Championships) च्या 400 मीटर स्पर्धेत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. 


हिमाने 51.46 सेकंदात शर्यत पूर्ण केली. जागतिक स्तरावर ट्रॅक स्पर्धेत गोल्ड जिंकणारी हिमा ही पहिली भारतीय आहे. यापूर्वी भारताच्या कोणत्याही महिला किंवा पुरुष क्रीडापटुला ही कामगिरी करता आलेली नाही. अगदी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांनाही ही कमाल करता आलेली नाही.  


शेतकऱ्याची मुलगी
हिमा दास ही आसाममधील नगांव जिल्ह्यातील धिंग या गावची राहणारी आहे. अत्यंत सर्वसाधारण कुटुंबातून आलेल्या हिमाने हे अनन्य साधारण यश मिळवले आहे. हिमाचे वडील शेतकरी असून ते तांदळाची शेती करतात. कुटुंबातील सहा भावंडांमध्ये ती सर्वात छोटी आहे.  


फुटबॉलमध्ये करायचे होते करिअर 
खरं तर हिमा फुटबॉल खेळायची. तिला फुबॉमध्ये स्ट्रायकर म्हणून नाव कमवायचे होते. त्यासाठी तिचे प्रयत्नही सुरू होते. पण तिच्या कोचनी तिच्यातील गुण हेरले आणि तिला या क्षेत्रात आणले. विशेष म्हणजे तिने अवघ्या दोन वर्षांपूर्वी ट्रॅकवर पाऊल ठेवले होते. तिला अनेक आर्थिक अडचणी होत्या, पण कोचने तिला सर्वतोपरी मदत करत यशोशिखरावर जाण्यासाठी मदत केली. हिमा अॅथलिट बनण्यासाठी कुटुंबाला सोडून त्यांच्यापासून लांब 140 किलोमीटर अंतरावर राहत होती, असे तिचे कोच निपोन दास म्हणाले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...