आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Government To Present Fugitive Economic Offenders Bill In Parliament As Cabinet Clears Way

नीरव, मल्ल्यासारख्या आर्थिक गुन्हेगारांची सर्व संपत्ती जप्त होणार, विधेयकास सरकारची मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात दुसऱ्या टप्प्यात विधेयक मांडले जाणार आहे. - Divya Marathi
5 मार्चपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात दुसऱ्या टप्प्यात विधेयक मांडले जाणार आहे.


नवी दिल्ली - विजय मल्ल्या, नीरव मोदी आणि मेहुल चौकसीसारख्या फरार गुन्हेगारांची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी विशेष कायदा केला जाईल. १०० कोटींवर घोटाळा करणारे कायद्याच्या कक्षेत असतील. यासंबंधीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी मंजुरी दिली. यात बेनामी संपत्तीही जप्त करता येईल. हे गुन्हेगार देशात दिवाणी दावेही दाखल करू शकणार नाहीत.

 

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, संसद अधिवेशनात दुसऱ्या टप्प्यात हे विधेयक संसदेत मांडले जाईल. खटल्यात मदत न करणारेही या कायद्याच्या कक्षेत येतील. १०० कोटींहून अधिक कर्ज घेऊन ते मुद्दाम न फेडणाऱ्यांनाही या तरतुदी लागू होतील. ज्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले आहे त्यांना फरार मानले जाईल. राजकीय पक्षांनी अशा गुन्हेगारांना संरक्षण देऊ नये. तरच नव्या कायद्याने तातडीने वसुली शक्य होईल.


दरम्यान, ऑडिटर्सवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रिमंडळाने नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अॅथॉरिटीलाही मंजुरी दिली. चार्टर्ड अकाउंटंट, त्यांच्या कंपन्या या प्राधिकरणाच्या कक्षेत येतील.

 

बँकांची ९ हजार कोटींहून अधिक रक्कम बुडवून मद्य व्यावसायिक विजय मल्ल्या देशातून पळाला आहे. पीएनबीला १२,७१७ कोटींना गंडवून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चौकसीही पळाले आहेत. यामुळे कठोर कायद्याची गरज निर्माण झाली.

 

मेहुल चौकसीची १२०० कोटींची संपत्ती जप्त
पीएनबी घोटाळ्यात ईडीने गीतांजली ग्रुपचा प्रमुख मेहुल चौकसीच्या ४१ आणखी मालमत्ता जप्त केल्या. यांची किंमत १२०० कोटींहून अधिक आहे. जप्त संपत्तीमध्ये मुंबईतील १५ फ्लॅट, १७ ऑफिस, कोलकात्यातील शॉपिंग मॉल, अलिबागचे ४ एकर फार्म हाऊस तसेच महाराष्ट्र व तामिळनाडूतील २३१ एकर भूखंड आदींचा समावेश आहे.

 

घाेटाळेबाज नीरव माेदीच्या प्रतिमेची हाेळी : मुंबईतील बीडीडी चाळीतील मंडळातर्फे दरवर्षी वाईट प्रवृत्तींचे दहन केले जाते. पीएनबी बँकेला तब्बल साडेबारा हजार काेटींचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव माेदीच्या प्रतिमेचे यंदा दहन करण्यात अाले. सुमारे ५० फूट उंच नीरवची प्रतिमा उभारून सायंकाळी त्याचे दहन करण्यात आले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, नीरव मोदीच्‍या ज्‍या प्रतिमेची होळी करण्‍यात आली तिचा फोटो...
 

 

बातम्या आणखी आहेत...