आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दाही गंभीर, सरकारची कायद्यात फाशीची शिक्षा करण्याची तयारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मोदी सरकारने नुकतेच बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक काद्यात (पॉक्सो अॅक्ट) मोठे बदल केले आहेत. यानुसार 12 वर्षांपर्यंतच्या मुलीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आता सरकार या काद्यात आणखी एक संशोधन करण्याची तयारी करत आहे. त्यानुसार मुलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणालाही गंभीर गुन्हा मानून या प्रकरणातील आरोपींनाही फासावर लटकवण्याची तरतूद कायद्यात केली जाण्याची शक्यता आहे. 

 

यावेळी महिला आणि बाल विकास मंत्रालय हे लैंगिक शोषणाची शिकार ठरलेल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधन करण्याची तयारी करत आहे. 
- मंत्रालयाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे, की सरकारने आता लैंगिक शोषणाचे शिकार ठरलेल्या मुलांना न्याय देण्याच्या दृष्टीने पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधनाचा प्रस्ताव तयार केला आहे. 
- महिला आणि बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटले आहे की लैंगिक शोषण ही गंभीर समस्या आहे. त्या म्हणाल्या, 'बाल लैंगिक शोषण हा सर्वाधिक दुर्लक्षिला जाणारा वर्ग आहे. मात्र तो सर्वाधिक पीडित आहे. यात मुलांचीही संख्या गंभीर आहे. बाल लैंगिक शोषणात लिंगाच्या आधारावर कोणताच भेदभाव नाही.'

 

आयुष्यभराची जखम असते-आत्ममग्न-शांतशांत राहातात 
- बालपणी लैंगिक शोषणाची शिकार झालेली मुले हे पुढील आयुष्यात एकांतात राहाणे पसंत करतात. ते आपल्याच विश्वास असतात. शांत-शांत. ही गंभीर समस्या आहे आणि त्यापासून मुलांची सोडवणूक गरजेची आहे. 

 

सरकारने हे बदल केले आहेत... 
>
महिलांसोबत दुष्कर्म करणाऱ्या आरोपीला कमीतकमी 7 ते 10 वर्षे शिक्षेचा निर्णय होता. ही शिक्षा आता आजन्म कारावासा पर्यंत वाढवता येऊ शकते.  
> 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी 10-20 वर्षे शिक्षा. ही शिक्षाही आजन्म कारावासा पर्यंत वाढवता येऊ शकते.  
> 16 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीवर गँगरेप केल्या जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. 
> 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीवर बलात्कार केल्यास कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेप आणि मृत्यूदंडाची शिक्षा शक्य आहे. 
> 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्यास आरोपींना जन्मठेप त्यासोबत मृत्यूदंडाची शिक्षा. 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, अशा खटल्यांची चौकशी दोन महिन्यात पूर्ण करावी लागेल... 

बातम्या आणखी आहेत...