आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कडब्याने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी अनुदान; ‘क्लिन एअर इम्पॅक्ट योजना’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- प्रदूषण राेखण्यासाठी केंद्र सरकारने शेतात कडबा न जाळणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे. ज्या पंचायत भागातील एका शेतात कडबा जाळला जाणार नाही, त्यांनाही एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी क्लिन एअर इम्पॅक्ट निधी तयार करण्यात आली आहे. कडबा जाळणापासून रोखण्यासाठी १२०० कोटींचा निधी यावर्षीपासून वापरण्यास मुभा देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अनुदानापोटी देण्यात येणारी रक्कम सरकारी स्तरावर अजून ठरायची आहे. ही योजना जून -जुलैपासून म्हणजे खरीपाच्या आधीपासून अमलात येईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या पंचायतीसाठी सुमारे ७०० कोटी रुपयाचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. ही योजना प्रामुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व राजस्थान या चार राज्यांत अमलात येणार आहे. 


ही योजना कृषी मंत्रालय, वीज मंत्रालय, आयआयटी कानपूर व सीआयआय या औद्योगिक संघटनेने तयार केली आहे.  याची नोडल एजन्सी पर्यावरण मंत्रालय असेल. योजनेचा उद्देश उत्तर भारतात वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आहे. उत्तर भारतात गेल्या  नोव्हेंबर  व डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर वायू प्रदूषण झाले होते. 


पाहणीनंतर शेतकऱ्यांना मिळाणार अनुदान

योजना तयार करण्यासाठी सहभागी असलेल्या संबंधित सीआयआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले,कडबा न जाळण्यासाठी शेतकऱ्यांना खूप खर्चिक पर्याय अवलंबावे लागतील. यामुळे त्यांना मदत म्हणून अनुदान देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यापूवी त्याने शेतात कडबा जाळला आहे की नाही, याची पाहणी केली जाईल. 

 

या तंत्राने कडबा हटवणार सरकार

- मल्चिंग : धान कापल्यानंतर उरलेला हिस्सा यंत्राच्या साह्याने वेगळा करुन शेतात सोडण्यात येतो. तो कुजून शेतातील मातीत मिसळतो. शेतात खत कमी लागते. 
- कोळसा : माती व विटापासून तयार छोट्या घरात कडबा ठेवून जाळला जाताे. ऑक्सिजन कमी मिळत असल्याने त्या मंद जळतात. प्रदूषण घटते. यावेळी जमा झालेली काजळी मातीत मिसळल्याने जमीन कसदार होते. रसायनाचा वापर कमी लागतो. 
- कडब्यांपासून पॅलेट : कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीज केंद्रात कडब्यापासून तयार केलेले पॅलेट वापरले जातात. एनटीपीसीने पॅलेटच्या खरेदीसाठी निविदाही काढल्या आहेत. पॅलेट कोळशासोबत मिसळून प्रकल्पात वापरले जातात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

चार राज्यांत कडबा जाळण्याचे प्रमाण जास्त 
अहवालानुसार पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानातील दोन डझनहून अधिक जिल्ह्यात कडबा जाळला जाताे. पंजाबच्या मोगा, पतियाळा, लुधियाना , संगरूर व बर्नाला या पाच जिल्ह्यात कडबा जाळला जाताे. धाननंतर शेतकऱ्यांना रबीची पेरणी करावी लागते. यासाठी त्यांना १५ ते २० दिवसाचा अवधी मिळतो. त्यावेळी शेतकरी शेतात कडबा जाळतात.

बातम्या आणखी आहेत...