आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामुहिक विवाह : कुठे नवरदेवच पोहोचला नाही, तर कुठे लग्न लावणारा शिक्षक बेपत्ता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 श्योपूर (ग्वाल्हेर) - मुख्यमंत्री कन्यादान योजनेंतर्गत बुधवार सामुहिक विवाह सोहळ्यात 426 विवाह लावण्यात आले. यादरम्यान काही ठिकाणी नवरी मुली नवरदेवाची वाट पाहत बसल्या होत्या. तर काही ठिकाणी नवरदेव अगदी फेरे सुरू होईपर्यंतही लग्नाच्या 

ठिकाणी पोहोचले नाही. गर्दीमुळे उशिरा पोहोचलेल्या नवरदेवांना आणि नवरींना त्यांच्या क्रमांकाचा मांडवत सापडला नाही. त्यामुळे त्यांना यादरम्यान बाहेरच थांबावे लागले. या विवाह सोहळ्यामध्ये गर्दी अचानक वाढल्यामुळे लोकांना मोठ्या असुविधेचा सामना करावा लागला. 


नवरदेव आला नाही, नवरी वाट पाहत बसली..  
- मांडव क्रमांक 135 वर दोन जोडपी बसलेली होती. त्यामध्ये नवरी निशा ही नवरदेवाची वाट पाहत होती. पण फेरे सुरू झाले तरी नवरदेव पोहोचला नव्हता. 
- नवरीचे वडील नवरदेवाकडील लोकांना फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत राहिले. पण त्यांचा फोनही लागू शकला नाही. 
- दुसरीकडे या मांडवामध्ये लग्नाचे विधी करण्यासाठी ज्या लोकांची ड्युटी लावण्यात आली होती, तो पोहोचलाच नाही. त्यामुळे अनेकांचे फेरेच होऊ शकले नाही. 

 

 

बातम्या आणखी आहेत...