आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Gujarat Elections: Congress Takes U Turn, Meeting With Pakistani High Commissioners

गुजरात निवडणूक काँग्रेसने घेतला यू टर्न, पाकिस्तानी उच्चायुक्तांसोबत बैठकीची कबुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरात निवडणुकीत पाकिस्तानचा हस्तक्षेप आणि निलंबित काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानी उच्चायुक्त आणि माजी परराष्ट्र मंत्र्यांच्या गुप्त बैठकीच्या आरोपावरून सोमवारी दिवसभर राजकारण तापलेले होते. माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांनी बैठक झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी २४ तासांच्या आतच यू टर्न घेत बैठक झाल्याचे मान्य केले. आता जेवणासाठीही सरकारची परवानगी घ्यावी लागेल का, असा सवालही त्यांनी केला. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग म्हणाले की, मोदी राजकीय फायद्यासाठी देशासमोर चुकीचे उदाहरण सादर करत आहेत. त्यांनी देशाची माफी मागावी. दुसरीकडे, निवडणुकीत आपले नाव गोवल्यामुळे पाकिस्तानने आक्षेप घेत भारताला सल्लाही दिला. 

 

यात आम्हाला ओढू नका, स्वबळावर विजय मिळवा : पाकिस्तान
भारताने अापल्या निवडणुकांत पाकला ओढू नये. बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी त्यांनी आपल्या हिमतीवर निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. 
- मोहंमद फैजल, पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते

 

 सल्ले देऊ नका, तुम्हाला जग ओळखून आहे : केंद्र सरकार
दहशतवादावर पाक कशी कारवाई करतो, हे जगजाहीर आहे. लोकशाहीबद्दल सल्ले देऊ नका. भारत स्वबळावर निवडणुका लढतो. मोदी व भाजप जनतेच्या आशीर्वादावर निवडणुका जिंकतात. 
- रविशंकर प्रसाद, कायदामंत्री

 

काँग्रेस : आनंद शर्मा
अय्यर यांच्या घरी डिनर मीटिंग झाली होती. मात्र आता त्यासाठीही सरकार व संस्थांकडून परवानगी घ्यावी लागेल का? पीएम मोदींनी राजकीय चर्चा अत्यंत खालच्या पातळीवर आणली आहे. आम्हाला त्यांच्याकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र नको. त्यांनी माफी मागावी. 


काँग्रेस : मनमोहनसिंग
डिनरवर गुजरात निवडणुकीबाबत कुणीही चर्चा केली नाही. गुजरातेत पराभवाच्या भीतीने मोदी कंड्या पिकवत आहेत. खोटारडेपणा व अफवा पसरल्याने मी अत्यंत दु:खी आहे. त्यांनी काँग्रेसला राष्ट्रीयत्व शिकवू नये. पीएमपदाची प्रतिष्ठा कमी केल्याने देशाची माफी मागावी. 


भाजप : अरुण जेटली
पाकच्या भूमीवरून दहशतवाद संपल्याशिवाय उच्च पातळीवर चर्चा होणार नाही, हे स्पष्ट राष्ट्रीय धोरण आहे. काँग्रेस नेत्यांनी स्वतंत्रपणे बैठक घेतली. निवडणुकीदरम्यान बैठकीचा उद्देश व औचित्य सांगावे. अय्यरसारख्या लोकांनी कधीही हे राष्ट्रीय धोरण मान्य केलेले नाही. 

 

हेही वाचा, 2014 नंतर 18 राज्यांत निवडणुका, त्यापैकी 13 मध्ये पाकचा उल्लेख ठरला प्रचाराचा मुद्दा...

बातम्या आणखी आहेत...