आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CM खट्टर यांच्या गावात हरियाणवी गायिका ममता शर्माची निर्घृण हत्या, बलात्कारचीही शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर गुरुवारी ममताचा मृतदेह सापडला. - Divya Marathi
चार दिवस बेपत्ता राहिल्यानंतर गुरुवारी ममताचा मृतदेह सापडला.

नवी दिल्ली - बलात्कार, गँगरेप आणि हत्याकांडाने खळबळ माजवलेल्या हरियाणामध्ये थेट मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या गावात एका रागिणी गायिकेचा मृतदेह आढळला आहे. ममता शर्मा नाव असलेल्या गायिकेचा गळा आवळून खून करण्यात आला. ममता हरियाणवी गायिका ममता शर्मा रोहतकची रहिवासी होती. रविवारी एका कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडलेली ममता शर्मा परत घरी आलीच नाही. 

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ममता शर्माचा मुलगा भारतने सांगितले, की रविवारी मोहित नावाची व्यक्ती घरी आली. ममता, मोहित आणि सहकारी कलाकारांसोबत सकाळी 8 वाजता घरातून बाहेर पडली. सकाळी 10.30 वाजता मोहितचा भारतला फोन आला. त्याने सांगितले, की ममता शर्मा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसऱ्या गाडीतून गेली, ती थेट कार्यक्रम स्थळी येणार होती. मात्र ती कार्यक्रम स्थळी पोहोचली नाही तेव्हा मोहितने भारतला फोन करुन ही माहिती दिली. कुटुंबियांनी सोमवारी दिवसभर ममताचा शोध घेतला, परंतू ती कुठेच सापडली नाही. तिचा फोनही बंद येत होतो. यानंतर सोमवारी  प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. 

भारतने सांगितल्यानुसार, सोमवारी फोन केला तेव्हा रिंग जात होती मात्र फोन कोणी उचलला नाही. भारतने ही माहिती पोलिसांना दिली. यावर पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा भारतचा आरोप आहे. 

 

गुरुवारी ममताचा मृतदेह बलियाना गावाजवळील एका शेतात सापडला. हे हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे गाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार ममता शर्माची गळा चिरून हत्या करण्यात आली आणि त्यानंतर तिचा मृतदेह शेतात फेकून देण्यात आला. ममता कलानौर गावात राहात होती. 

 

पोलिसांनी सांगितले, की खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अशीही शक्यता वर्तवली जात आहे की हत्येआधी ममतावर बलात्कार करण्यात आला होता. मात्र अद्याप पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतरच तपासाला वेग येईल.

 

ऑक्टोबरमध्येही झाली होती एका गायिकेची हत्या 
- ऑक्टोबर 2017 मध्ये हरियाणवी लोक गायिका आणि डान्सर हर्षिता दाहिया (20) हिची गोळ्या मारून हत्या करण्यात आली होती. 
- सोनीपत येथे तिच्या गाडीला दुसऱ्या गाडीने ओव्हरटेक करुन थांबवले आणि गाडीतून दोन जण बाहेर आले. हर्षिताच्या सोबत असलेल्या लोकांना पळून जाण्यास सांगितले. त्यानंतर अतिशय जवळून हर्षितावर चार गोळ्या झाडल्या. 
- गोळीबार घटनेच्या काही तास आधी हर्षिताने तिला मारण्याची धमकी येत असल्याचे फेसबुकवर सांगितले होते. व्हिडिओ अपलोड करत हर्षिता म्हणाली होती, की ती धमक्यांना घाबरत नाही. पोलिसांनी हत्येच्या आरोपात तिच्या बहिणीच्या नवऱ्याला अटक केली होती. 

 

 

पुढील स्लाइडमध्ये वाचा, एम.ए. झाल्यानंतर सुरु केले होते स्टेज शो... 

बातम्या आणखी आहेत...