आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटक: 30-30 महिने CM फॉर्म्यूला कुमारस्वामींना नामंजूर, काँग्रेस- सत्तेत आमचाही महत्त्वाचा वाटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटक राजकीय नाट्याचा पहिला अंक येदियुरप्पा यांच्या राजीनाम्याने संपला आहे. काँग्रेस-जेडीएसच्या तडजोडीच्या राजकारणाने दुसऱ्या अंकाला सुरुवात झाली आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी 30-30 महिन्यांचे मुख्यमंत्रीपद हा फॉर्म्यूला सपशेल नाकारला आहे. तर, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे, की सत्तेमध्ये आम्हाला महत्त्वाची भागीदारी मिळाली पाहिजे. मंत्रिमंडळाबद्दल चर्चा करण्यासाठी कुमारस्वामी आज (सोमवार) दिल्लीत आले आहे. कुमारस्वामी यूपीए नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. बुधवारी त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी अनेक नेते उपस्थित राहाण्याची शक्यता आहे. 

 

कुमारस्वामी म्हणाले- मुख्यमंत्रीपदावर कोणतीच चर्चा नाही
- जेडीएस आणि काँग्रेस यांच्यात 30-30 महिने मुख्यमंत्री पद राहाणार असल्याची मीडियाचमध्ये चर्चा होती. या प्रश्नावर कुमारस्वामींनी स्पष्ट केले, की अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चा झालेली नाही. या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे सांगत ते म्हणाले, काँग्रेस नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनुसार, मुख्यमंत्रीपद हे जेडीएसकडेच राहील. मंत्रिमंडळाची रुपरेषा ठरवण्यासाठी राहुल गांधी आणि सोनिया गांधींची सोमवारी दिल्लीत भेट घेणार आहे. हे सरकार 5 वर्षे चालेल, यासाठी त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल. 

 

दोन उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता 
- कर्नाटकमध्ये दोन उपमुख्यमंत्री राहातील अशी शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी परमेश्वर यांनी याचे संकेत दिले आहेत. 
- परमेश्वर हे उपमुख्यमंत्री राहाणार असल्याची चर्चा आहे. जेडीएसनेही दोन उपमुख्यमंत्री राहाणार असल्याचे वृत्त नाकारलेले नाही. 

बातम्या आणखी आहेत...