आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उष्णतेची लाट: खजुराहोमध्ये तापमान 45 डिग्रीवर, राजस्थानातील वाळवंटी प्रदेशात पारा 44 डिग्रीच्या पुढे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - उत्तर भारतात उष्णतेची लाट आली आहे. खजुराहो येथील तापमाना 45  डिग्रीवर सेल्सियसवर पोहचले आहे. राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशात पारा 44 डिग्री सेल्सियसवर गेला आहे. तर मध्यप्रदेशातील 17 शहरांच्या तापमानाने 41 डिग्री पार केले आहे. हवामान तज्ज्ञांचे मत आहे की राजस्थानमधील उष्ण हवा ही दुसऱ्या राज्यातील शहरांचे तापमान वाढवत आहे. 

 

मध्यप्रदेश 
- राज्यात सर्वाधिक तापमाना खजुराहोमध्ये (45 डिग्री) नोंदवले गेले आहे. राजस्थान आणि गुजरातमधील उष्णतेच्या लाटेमुळे गुरुवारी राज्याचे तापमान वाढले होते. 
- गुरुवारी भोपाळमध्ये 41.8 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी 6.30 पासून साधारण 11.30 पर्यंत प्रत्येत तासाला तापमानात दोन ते तीन डिग्री सेल्सियसची वाढ नोंदवली जात होती. 
- ग्वाल्हेरमध्ये पारा 43.3 डिग्रीवर पोहोचला होता. 
- पुढील 24 तासांत दमोह, जबलपूर, खजुराहो, मंडला, नौगाव, रीवा आणि टीकमगड या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी उष्णतेची लाट राहाण्याची शक्यता आहे. 

 

राजस्थान 
- जयपूरमध्ये 41.6 डिग्रीसह गुरुवार हा यंदाच्या सीजनमधील सर्वाधिक उष्ण दिवस ठरला. तर, वाळवंटी भागातील बाडमेर, जैसलमेर, चुरू आणि गंगानगर येथे तापमान 44 डिग्रीवर पोहोचले. 

 

छत्तीसगड 
- पश्चिमी हवेच्या प्रभावामुळे येथे उष्णतेची लाट आली आहे. रायपूरमध्ये गुरुवारी 41.2 डिग्री सेल्सियस तापमानाची नोंद झाली. 
- बिलासपूर, पेंड्रारोड, अंबिकापूर या सर्वठिकाणी पारा 40 अंश सेल्सियसच्या वर गेला होता. बिलासपूरमध्ये सर्वाधिक 43 डिग्री तापमानाची नोंद झाली. 

 

दिल्ली 
- दिल्लीत शुक्रवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. येथे पारा 43 अंश सेल्सियसवर पोहोचला. गुरुवारी 42 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली होती.
- हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की दिवसभर वातावरण निरभ्र राहील, रात्रीमात्र हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...