आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतामधील13 राज्यांना वादळाचा इशारा; राज्यांनी उपाययोजनात्मक पावले उचलण्यास केली सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यातच उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह सुमारे 14 राज्यांमध्ये जोरदार वादळामुळे सुमारे 125 लोकांना प्राण गमवावा लागला होता. (फाइल) - Divya Marathi
गेल्या आठवड्यातच उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह सुमारे 14 राज्यांमध्ये जोरदार वादळामुळे सुमारे 125 लोकांना प्राण गमवावा लागला होता. (फाइल)

नवी दिल्ली - राजस्थानात सोमवारी अनेक भागांत वाळूची वादळे आली. पंजाबमध्येही वावटळी उठल्या. हवामान खात्याने मंगळवारीही उत्तर भारतातील अनेक भागात वादळाची शक्यता वर्तवली आहे. राजस्थान, हरियाणा, पंजाब, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पश्चिम-उत्तर प्रदेशातील काही भागांत ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा िदला आहे. सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्येही असाच इशारा देण्यात आला आहे. राजस्थानात वाळूच्या वादळाचा इशारा दिला आहे.

 

हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर राज्यांनी उपाययोजनात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. हरियाणात नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत. दिल्लीत दुपारी पालिका शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. आपत्कालीन संस्थांना सज्ज राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...