आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताविरोधी खोट्या प्रचारासाठी पाक शीख बांधवांना बनवतेय दहशतवादी:गृह मंत्रालय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दहशतवादी, शीख तरुणांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराने कट्टरता वाढवली जात आहे. - फाइल - Divya Marathi
दहशतवादी, शीख तरुणांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या चुकीच्या वापराने कट्टरता वाढवली जात आहे. - फाइल

नवी दिल्ली - भारतात हल्ले करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय शीख तरुणांना दहशतवादाचे प्रशिक्षण देत आहे. गृह मंत्रालयाच्या मते, कॅनडा आणि इतर ठिकाणी राहणाऱ्या शीख बांधवांना भारताच्या विरोधात चुकीची आणि खोटी माहिती दिली जात आहे. या तरुणांना भारताविरोधी चिथावणी दिली जात आहे. 


इंटरनेटद्वारे पसरवला जातोय द्वेष 
- गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी भाजप खासदार सांसद मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय मंडळाला सांगितले की, दहशतवादी संघटना शीख तरुणांमध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे कट्टरता वाढवत आहे. हे एक मोठे आव्हान आहे. 
- कमिटीच्या रिपोर्टनुसार केंद्रीय सशस्त्र पोलिस दल आणि अंतर्गत सुरक्षा संस्थांनी सोमवारी संसदेमध्ये सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये म्हटले की, गेल्या काही दिवसांत पाकिस्तानात शीख दहशतवादी संघटनांमध्ये वाढ झालेले पाहायला मिळत आहे. 


दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी ISI चा दबाव 
- रिपोर्टनुसार आयएसआय दहशतवादी संघटनांचे कमांडर आणि गुप्तचर संस्थांवर पंजाबसह देशभरात दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यासाठी दबाव आणला जात आहे. त्यासाठी शीख तरुणांना आयएसआयद्वारे प्रशिक्षित केले जात आहे. 
- गोपनीय माहितीनुसार तुरुंगात आलेले नवीन केडर, बेरोजगार तरुण, अपराधी आणि तस्कर यांना पाकिस्तानच्या शीख दहशतवादी संघटनेत दहशतवादी हल्ल्यांसाठी सहभागी करून घेतले जात आहे. 


एजन्सीजची नजर 
रिपोर्टनुसार युरोप, यूएस आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या शिखांना चिथावणी देऊन त्यांना भारतविरोधी कारवायांसाठी तयार केले जात आहे. देशातील एजन्सीज पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मदसह इंडियन मुजाहिदीन आणि सिमीवर नजर ठेवून आहेत. गरज पडल्यास कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले. डाव्यांचा पाठिंबा असलेल्या दहशतवादाचा धोका असल्याचेही गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...