आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - देशातील कॉर्पोरेट हाऊसेसची बाब जेव्हा समोर येते, तेव्हा अंबानी कुटुंब आणि RIL चे नाव पहिल्या स्थानावर समोर येते. टाटा, बजाज, बिर्ला, प्रेमजी, सांघवी यासारखे घराणे नंतरच येतात. नेटवर्थच्या हिशेबाने बोलायचे झाल्यास मुकेश अंबानी देशातील सर्वात धनाढ्य आसामी आहेत. संपत्तीच्या तुलनेत या कॉर्पोरेट घराण्यांचा कोणताही व्यक्ती अंबानींच्या आसपासही नाही. तथापि, टाटा ग्रुपच्या एका कंपनीने जे यश मिळवले आहे, ते बहुधा बिझनेसमध्ये दोन पिढ्या घालवूनही अंबानी परिवाराला मिळालेले नाही.
TCS बनली देशाची सर्वात मौल्यवान कंपनी
टाटा समूहाची कंपनी टीसीएसने सोमवारी नवा इतिहास रचला. सोमवारच्या उलाढालीदरम्यान मार्केट कॅपच्या हिशेबाने 100 अब्ज डॉलरचा आकडा पार करणारी ती देशाची पहिली कंपनी बनली. यासोबतच 23 एप्रिल 2018 ही तारीख देशाच्या स्टॉक एक्स्चेंजच्या इतिहासात नेहमी नोंदली गेली. शुक्रवारीच कंपनीचा मार्केट कैप 99.1 अब्ज डॉलवर पोहोचला होता. ही तेजी सोमवारीही जारी राहिली आणि 09.49 वर कंपनी व्हॅल्यूच्या हिशेबाने 6,62,726.36 च्या लेव्हलवर पोहोचली, तिने इतिहास रचला आणि यासोबतच डॉलरच्या हिशेबाने 100 अब्ज डॉलरचा मार्केट कॅप असणारी देशाची पहिली कंपनी बनली.
पुढच्या स्लाइड्वर पाहा, काय असतो मार्केट कॅप व इंटरेस्टिंग FACTS...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.