आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • दिल्‍लीमध्‍ये विवाहबाह्य संबंधातून पत्‍नीची हत्‍या, मृतदेहाचे केले 7 तुकडे, Husband Murders Wife In Sarita Vihar Delhi

Shocking: पतीच्‍या विवाहबाह्य संबंधातून पत्‍नीची निर्घृण हत्‍या, मृतदेहाचे केले 7 तुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साजिद आणि जुही यांचा 2011 मध्‍ये प्रेमविवाह झाला होता. (मृत जुही यांचा फाईल फोटो) - Divya Marathi
साजिद आणि जुही यांचा 2011 मध्‍ये प्रेमविवाह झाला होता. (मृत जुही यांचा फाईल फोटो)

नवी दिल्‍ली- विवाहबाह्य संबंधामुळे झालेल्‍या वादातून पत्‍नीची हत्‍या करत तिच्‍या मृतदेहाचे 7 तुकडे केल्‍याची धक्‍कादायक घटना दिल्‍लीतील सरिता विहार येथे घडली आहे. याप्रकरणी आरोपी पती साजिद अली अंसारी याला दिल्‍ली पोलिसांनी अटक केली आहे. धक्‍कादायक म्‍हणजे पत्‍नीच्‍या मृतदेहाची विल्‍हेवाट लावण्‍यासाठी आरोपीने आपल्‍या दोन भावांची मदत घेतली. त्‍यांनाही अटक करण्‍यात आली आहे.


दोघांचा झाला होता प्रेमविवाह
पोलिसांनी केलेल्‍या चौकशीमध्‍ये साजिदने सांगितले की, त्‍याने पत्‍नी जुहीशी 2011मध्‍ये प्रेमविवाह केला होता. मात्र बीटेक करूनही साजिदला नोकरी मिळाली नाही. याचदरम्‍यान त्‍याची एका महिलेसोबत मैत्री झाली होती. त्‍यांच्‍या या संबंधावरून दोघांमध्‍ये सतत वाद होत असे. अखेर त्‍याने आपल्‍या पत्‍नीच्‍या हत्‍येचा कट रचून तिला संपवले.

 

पोलिस असे पोहोचले आरोपीपर्यंत 
पत्‍नीची हत्‍या केल्‍यानंतर साजिदने व त्‍याच्‍या 2 भावांनी (मोहम्मद इश्तियाक आणि मोहम्मद अस्मत अली) पत्‍नीच्‍या मृतदेहाचे 7 तुकडे करून ते एका खोक्‍यामध्‍ये टाकले होते. हा खोका नंतर त्‍यांनी सरिता विहारमधील रिकाम्‍या फ्लॅटमध्‍ये फेकून दिला होता. या खोक्‍यावरुनच पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले.

 

दक्षिण पुर्व दिल्‍लीचे डीसीपी चिन्‍मय बिस्‍वाल यांनी सांगितले की, आम्‍हाला 21 जून रोजी मृतदेह ठेवण्‍यात आलेला खोका मिळाला.  त्‍या खोक्‍यावर बिगफोर्ट मूवर्स पॅकर्स असे लिहिलेले होते. ही गुडगावची कंपनी असल्‍याचे नंतर माहित झाले. कंपनीकडे चौकशी केली असता कळाले की, या खोक्‍यातून युएईमधून वस्‍तू मागवण्‍यात आल्‍या होत्‍या. तसेच या वस्‍तू जावेद अख्‍तर या व्‍यक्‍तीने मागविल्‍या होत्‍या. जावेदची चौकशी केली असता त्‍याने सांगितले की, हा खोका आपण दिल्‍लीतील शाहीन बागमधील एका फ्लॅटमध्‍ये ठेवला होता. जेथे साजिद किरायाने राहत होता. मात्र जेव्‍हा पोलिस या फ्लॅटवर पोहोचले तेव्‍हा फ्लॅटला कुलूप लावलेले त्‍यांना दिसले. नंतर पोलिसांनी तिन्‍ही आरोपींना जामिया नगरमधून अटक केली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, अटकेत असलेला आरोपी पती व त्‍याचे दोन भाऊ...

 

बातम्या आणखी आहेत...