आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मी सदैव अल्पसंख्याकांच्या पाठीशीच, मी काँग्रेस आहे!’, राहूल गांधींनी स्‍पष्‍ट केली भुमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाची अल्पसंख्याकांविषयीची भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ‘मी काँग्रेस आहे’, अल्पसंख्याक मुस्लिमांच्या पाठीशी सदैव राहीन, असा राग राहुल यांनी मंगळवारीही आळवला. रांगेतील शेवटच्या व्यक्तीसोबत मी आहे. द्वेष आणि भयाने ग्रासलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत काँग्रेस ठामपणे उभी राहील, असे त्यांनी म्हटले आहे. ‘पार्टी फॉर मुस्लिम’ या टीकेला राहुल यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रत्येक वंचित घटकासाठी काँग्रेस काम करेल. धर्म, जात निरपेक्ष मान्यतेसाठी आम्ही बांधील आहोत, असे ट्विट राहुल यांनी मंगळवारी केले.  


उर्दू दैनिकाने प्रकाशित केलेल्या मजकुरावरून हा वाद सुरू झाला होता. मुस्लिम विद्वानांची भेट गेल्या आठवड्यात राहुल यांनी घेतली होती. त्यात ते म्हणाले की, ‘काँग्रेस हा मुस्लिमांसाठीचा पक्ष आहे,’ असे विधान प्रसिद्ध झाल्याने विरोधकांनी राहुल यांच्यावर टीका केली होती. आझमगड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणातही हा मुद्दा उचलला होता. मी ते उर्दू दैनिक वाचले आहे, असे मोदी म्हणाले होते.  


भाजप म्हणजे वर्तमानातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच आहे, अशी टीका काँग्रेसजनांनी केली. देशात धर्म व जात द्वेष निर्माण करणे हा भाजपचा अजेंडा असून याआधारे ते सत्तेवर राहू इच्छितात, अशी टीका काँग्रेसने केली.  

 

सुरजेवालांचा दिला माध्यमांना खुलासा
मुस्लिम विद्वानांशी राहुल गांधी यांची चर्चा सुरू असताना संबंधित दैनिकाचा प्रतिनिधी तिथे उपस्थित नव्हता, असे पत्रपरिषद घेऊन काँग्रेसचे जनसंपर्क प्रमुख रणदीप सुरजेवालांनी सांगितले. सोमवारी खुलासे करण्यासाठी काँग्रेसला पत्रकार परिषद घ्यावी लागली. त्यानंतर मंगळवारीही राहुल यांनी त्याच विषयावर ट्विट केले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, परदेशी वंशाचे म्हणणाऱ्या उपाध्यक्षाला बसपने हटवले...

 

बातम्या आणखी आहेत...