आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिडिओकॉन कर्ज प्रकरण: चंदा कोचर यांना ICICIच्या सीईओ पदी कायम ठेवण्यावरुन संचालक मंडळात दोन गट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांना पदावर ठेवयाचे की नाही याचा निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा बँकेच्या संचालक मंडळात दोन गट पडले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, काही संचालक मंडळातील काहींनी चंदा कोचर यांना विरोध केला आहे. बँकेने मात्र हे वृत्त फेटाळले आहे. चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर देखील आहेत, त्यांचा कार्यकाळ 21 मार्च 2019 मध्ये संपणार आहे. व्हिडिओकॉन ग्रुपला 3,250 कोटी रुपये कर्ज दिल्याच्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करत आहे. चंदा यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे प्रमुख वेणुगोपाल धूत यांच्याविरोधात लुकआऊट सर्कुलर जारी झाले आहे. 

 

चंदा कोचर यांना पद सोडण्यास सांगण्याचे वृत्त निराधार 
- आयसीआयसीआय बँक प्रवक्त्यांनी ब्लूमबर्ग रिपोर्टचे खंडन केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की चंदा कोचर पद सोडणार असल्याचे वृत्त निराधार आहे. 
- बँकेच्या संचालक मंडळाने 28 मार्च रोजी आपल्या फायलिंगमध्ये दावा केला होता, की बँकेची क्रेडिट अप्रुवल प्रक्रिया पूर्णपणे योग्य आहे. चंदा कोचर यांनी कोणत्याही लाभाच्या मोबदल्यात कर्ज दिल्याचे आढळलेले नाही. 
- बँक संचालक मंडळाचे अध्यक्ष एम.के. शर्मा म्हणाले होते, की संचालक मंडळाला चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. 

 

चंदा यांचे दीर आणि धूत यांच्या निकटवर्तीयांची चौकशी 
- सीबीआयने चंदा यांचे दीर राजीव यांना 5 मार्च रोजी मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले होते.  त्यांची नियमीत चौकशी केली जात आहे. त्यासोबतच सीबीआय व्हिडिओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत यांचे निकटवर्तीय सहकारी महेश चंद्र पुंगलिया यांच्याकडेही चौकशी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...