आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If A Number Of Judges Are Involved In Deciding On Allocation Of Cases, It Might Lead To A Chaos: AG To SC

\'रोस्टर प्रक्रियेत जास्त जज आले तर अनागोंदी निर्माण होईल, CJI यांनीच करावे हे काम\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोस्टर संबंधीत दुसरी एक याचिका सीजेआय दीपक मिश्रा यांनी फेटाळली होती. - Divya Marathi
रोस्टर संबंधीत दुसरी एक याचिका सीजेआय दीपक मिश्रा यांनी फेटाळली होती.

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल यांनी सुप्रीम कोर्टाची रोस्टर व्यवस्था जैसे थे ठेवण्याचे अपील केले आहे. सुप्रीम कोर्टात कोणता खटला कोणत्या खंडपीठाकडे द्यावा हे निश्चित करण्याचा अधिकार कॉलेजियमला द्यावा या शांती भूषण यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. सुनावणी दरम्यान, अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल म्हणाले, की रोस्टर निश्चितीचा अधिकार सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांकडेच असला पाहिजे. या प्रक्रियेत जास्त जज आले तर अनागोंदी निर्माण होऊ शकते. 

 

जस्टिस चेलमेश्वर म्हणाले- देशाचीच इच्छा नाही, तर मी काय करु शकतो 
- सुप्रीम कोर्टमधील खटले वाटप आणि खंडपीठ स्थापन करण्यासंदर्भातील याचिकेवर ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी सुनावणी करावी असे आवाहन याचिकाकर्ते शांती भूषण यांचे चिरंजीव प्रशांत भूषण यांनी केले होते. 
- त्यावर जस्टिस चेलमेश्वर म्हणाले होते, माझा आदेश कोणीतरी 24 तासात बदलावा, अशी माझी इच्छा नाही. त्यामुळेच मी या याचिकेवर सुनावणी करु इच्छित नाही. 
- त्यासोबतच जस्टिस चेलमेश्वर म्हणाले होते, 'मला या याचिकेवर सुनावणी करण्याची इच्छा नाही. जणू मला काही मिळवायचे आहे. आणि त्यामुळे  कोणीतरी सतत माझ्याविरोधात अभियान चालवत आहे. माझा निर्णय 24 तासात बदलला जावा, अशी माझी इच्छा नाही. 
त्यामुळेच मी यावर सुनावणी करु शकत नाही. 
- जस्टिस चेलमेश्वर लवकरच निवृत्त होणार आहेत. ते म्हणाले, माझ्या निवृत्तीला काहीच दिवस शिल्लक आहे. जेव्हा देशालाच काही वाटत नाही तेव्हा मी काय करु शकतो. जर कोणालाच चिंता नाही तर मी का चिंता करावी. 

बातम्या आणखी आहेत...