आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • If The Return Is Completed After The Deadline, Then Penalty Of Up To 10 Thousand Rupees

मुदतीनंतर रिटर्न भरला तर 10 हजारांपर्यंत दंड; वित्त मंत्रालयाने जारी केले परिपत्रक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- निर्धारित मुदतीत प्राप्तिकर रिटर्न दाखल केल्यास दंड भरावा लागेल. विलंब शुल्क १ हजार रुपये ते १० हजार रुपयांपर्यंत असेल. या बाबतीत वित्त मंत्रालयाने परिपत्रक जारी केले आहे. १ एप्रिल २०१८ पासून हा नियम लागू होणार आहे. दंडाच्या वसुलीसाठी प्राप्तिकर कायद्यात २३४ एफ कलमाचा समावेश करण्यात आला आहे. सामान्यत: इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची शेवटची मुदत ३१ जुलै असते. 


परिपत्रकानुसार, २०१८-१९ असेसमेंट इयर म्हणजेच वित्तवर्ष २०१७-१८ साठी विलंब शुल्काच्या दोन श्रेणी आहेत. वार्षिक कमाई ५ लाख असेल तर १ हजार रु. लेट फीस लागेल. त्याहून जास्त उत्पन्नावर ५ ते १० हजारांपर्यंत दंड असू शकतो. मुदतीनंतर डिसेंबरआधी रिटर्न भरणाऱ्यांना १० हजार रुपये दंड आकारला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...