आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कनिष्ठ न्यायालय ते सुप्रीम काेर्टात 30 वर्षे चालला खटला; खटला दाखल करणारी महिला काल्पनिक पात्र!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बंगळुरूतील लक्ष्मी नावाची महिला आणि एका शैक्षणिक संस्थेतील वाद ३० वर्षे न्यायालयात चालला. कनिष्ठ न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी झाली. कहर म्हणजे याचिकाकर्ता महिला अस्तित्वातच नसून ते काल्पनिक पात्र असल्याचे समोर आले. ३० वर्षांमध्ये लक्ष्मीला कधी कोणी पाहिले नाही. ती कोर्टाच्या समोरही आली नाही. तरीही तिने खटले जिंकले. सर्वोच्च न्यायालयानेही २००६ मध्ये लक्ष्मीच्या बाजूने निकाल दिला. 

 
शैक्षणिक संस्थेच्या अपिलानंतर नव्याने खटल्याची सुनावणी सुरू झाली अन् खरा प्रकार समोर आला. सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने लक्ष्मीच्या अस्तित्वाचा खुलासा करून बंगळुरूच्या सेंट अॅनी शैक्षणिक संस्थेच्या बाजूने निर्णय दिला. न्यायमूर्ती लोकूर म्हणाले, ‘१९८९ ते १९९७ पर्यंत न्यायालयात पाॅवर ऑफ अॅटर्नी घेऊन बी. श्रीरामुलू यांनी लक्ष्मीची बाजू मांडली. १९९७ नंतर मात्र कोणीही आले नाही. लक्ष्मीने १९८९ मध्ये पहिल्यांदा कनिष्ठ न्यायालयात खटला दाखल केला तेव्हा तिचे वय ६७ वर्षे दाखवण्यात आले. तिचे वय सध्या ९६ वर्षे झाले आहे. अशा स्थितीत लक्ष्मी आता जिवंत आहे की नाही?’ आम्हाला तर वाटते ही महिला एक काल्पनिक पात्र आहे. २००९ मध्ये बंगळुरू पोलिसांनीही न्यायालयीन अवमान प्रकरणात लक्ष्मीला शोधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ती सापडली नाही.’ 
वरील बाबींच्या आधारावर उच्च न्यायालयाने लक्ष्मीच्या बाजूने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. ही याचिका निकाली काढण्यात आल्याचे त्यांनी न्यायमूर्ती  लोकूर यांनी जाहीर केले.

 

११ वर्षांपासून लक्ष्मीचे पाॅवर ऑफ अॅटर्नी कोर्टात आले नाही

कोर्ट म्हणाले, ‘लक्ष्मी नावाची महिला खटल्यातील याचिकाकर्ता आहे, असा समज ३० वर्षांपासून केला गेला. काेणत्याही कोर्टात लक्ष्मी आणि ११ वर्षांपासूनचे तिचे पाॅवर ऑफ अॅटर्नीही आले नाहीत.’ बंगळुरूतील कोडेनाहल्ली ही वादग्रस्त जागा संरक्षित असल्याचे सांगत लक्ष्मीने खटला दाखल केला होता. त्यामुळे सरकार ही जागा सेंट अॅनी संस्थेच्या नावावर करू शकत नाही, असे म्हटले जात होते. याच आधारे लक्ष्मी सतत खटला जिंकत आली.

बातम्या आणखी आहेत...