आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निनावी 3500 Cr मालमत्तेवर इनकम टॅक्सची टाच, 900 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये अॅक्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इनकम टॅक्स डिपार्टमेंटने (ITD) गुरुवारी सांगितले की त्यांनी 3,500 कोटी रुपये बेनामी संपत्ती जप्त केली आहे. ही कारवाई 900 पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये करण्यात आली आहे. डिपार्टमेंटकडून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये प्लॉट, फ्लॅट, शॉप्स, ज्वेलरी, व्हेईकल्स, बँक डिपॉझिट आणि एफडी यांचा समावेश आहे. आयटी डिपार्टमेंटने टाच आणलेल्या मालमत्तेमध्ये 2900 कोटी रुपयांपेक्षा जास्त स्थावर मालमत्ता आहे. देशामध्ये निनावी संपत्ती कायदा 1 नोव्हेंबर 2016 पासून लागू आहे. 

 

कशी केली कारवाई 
- डिपार्टमेंटने 5 केसेसमध्ये 150 कोटी मुल्यांच्या प्रॉपर्टीवर टाच आणली आहे. एका केस मध्ये समोर आले की रियल इस्टेट कंपनीने 50 एकर जमीन मिळवली होती. या जमीनीची बाजरभावाप्रमाणे किंमत 110 कोटी रुपये होती. मात्र यासाठी कंपनीने बनावट नावांचा वापर केला होता. अर्थात ही मालमत्ता निनावी होती. 
- आणखी एका प्रकरणात दोन जणांनी नोटबंदीनतर आपल्या कंपनीतील कर्मचारी आणि त्यांच्याशी संबंधीत लोकांच्या बँक अकाऊंटमध्ये बंद करण्यात आलेल्या नोटा जमा केल्या होत्या. ही रक्कम 39 कोटी रुपये होती. 

 

देशभरात 24 बीपीयू तयार 
- निनावी संपत्ती कायद्यांतर्गत निनावी संपत्ती तत्काळ ताब्यात घेऊन नंतर जप्तीची कारवाई करण्याचा अधिकार आहे. मग ती संपत्ती स्थावर मालमत्ता असेल किंवा जंगम. या कायद्यांतर्गत मालक आणि निनावी व्यवहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचीही तरतूद कायद्यात आहे. 
- या कायद्यानुसार दोषी अढळणाऱ्यांना 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. याशिवाय मालमत्तेच्या बाजरा भावाच्या 25% दंडही आकारला जाऊ शकतो.
- आयटीडीने इन्व्हेस्टिगेशन डायरेक्टोरेट अंतर्गत देशभरात 24 निनावी प्रोहिबिशन यूनिट्स तयार केले आहे. जेणेकरुन निनावी प्रॉपर्टीविरोधात कडक कारवाई करता येईल. 

कारवाईवर डिपार्टमेंट काय म्हणाले? 
- आयटीडीने म्हटले आहे की ब्लॅकमनी आणि निनावी व्यवहाराविरोधात आमचे अभियान असेच सुरु राहाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...